जळगाव (प्रतिनिधी) भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी युवा संमेलनाच्या निमिताने जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार होते. परंतू हा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे.
अमित शाह यांच्या उपस्थितीत जळगावात युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी रविवारी जामनेरात बैठक संपन्न झाली होती. यावेळी दौऱ्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. परंतू दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी लाठी आणि अश्रूधुराच्या नळकांड्यासह जवानांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सरकारकडून काळजी घेतली जात आहे. यामुळे अमित शहा यांचा जळगाव रद्द झाल्याचे कळतेय.