चाळीसगाव (प्रतिनिधी) कारमधून आलेल्या पाच जणांनी भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याची खळबळजनक घटना बुधवार दि. ७ जानेवारी रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास हनुमानवाडी परिसरात घडली होती. यामध्ये महेंद्र मोरे हे गंभीर जखमीझाल्यानंतर त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले होते. शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान रुग्णालय मोरेंचा मृत्यू झाला आहे. याबाबतचे वृत्त ‘टीव्ही ९’ ने दिले आहे.
गोळीबार प्रकरणी अजय संजय बैसाणे (वय ३१ वर्षे, धंदा मजुरी, रा. लक्ष्मी नगर, बसस्टॅन्डच्या पाठीमागे, चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून १) उददेश उर्फ गुडडू शिंदे (रा. हिरापुर), २) सचिन गायकवाड (रा. चाळीसगाव), ३) अनिस शेख उर्फ नव्वा शरीफ शेख (रा.हुडको कॉलनी, चाळीसगाव), ४) सॅम चव्हाण (रा. हिरापुर), ५) भुपेश सोनवणे (रा. चाळीसगाव) ६) सुमित भोसले (रा. चाळीसगाव) ७) संतोष निकुंभ उर्फ संता पहेलवान (रा. हिरापुर) यांच्याविरुद्ध गु.रं.नं ५६/२०२४ भादवि कलम ३०७, १२० (व), १४३, १४४, १४७, १४८, १४९ सह शस्त्रअधिनियम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. तसेच बैसाणे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पहिल्या पाच संशयितांनी गोळीबार केला तर सुमित भोसले आणि संतोष निकुंभ हे देखील या कटात सहभागी होते, असेही फिर्यादीत नमूद होते. दरम्यान, मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे आता संशयित आरोपींविरुद्ध खुनाचे कलम वाढवले जाणार आहे. मोरेंचा मृत्यूची वार्ता चाळीसगावात समाजात तणावात भर पडली आहे. मोरे यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त टीव्ही ९ ने दिले आहे. मोरे यांच्यावर चाळीसगावात अंतिमसंस्कार होणार असल्याचे कळते. तसेच गोळीबार केल्यानंतर मारेकरी ज्या वाहनातून पसार झाले होते, ते वाहन पोलिसांच्या हाती लागले आहे. तर लवकरच मारेकरी देखील गजाआड करू, असे पोलिसांनी सांगितले.