धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चमगांव रहिवासी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. नितीन वसंतराव पाटील, माजी सरपंच संभाजी पाटील उर्फ भैय्या पाटील, बिलखेड्याचे माजी सरपंच बंडूदादा काटे, विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील, उपसरपंच दिलीप भदाणे यांचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जीएम फाउंडेशन येथे भाजपात प्रवेश झाला.
डॉ. नितीन पाटील हे धरणगाव तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात प्रस्त असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी रुग्ण सेवा बरोबरच समाजसेवा ही मोठ्या प्रमाणात केली असल्याने त्यांचा दांडगा जणसंपर्क आहे. डॉ. नितीन पाटील हे शरद पवार गटाचे पदाधिकारी असून त्यांच्या भाजपा प्रवेशाने धरणगाव तालुक्यात भाजपाला बळ मिळणार आहे.
यावेळी आमदार राजू मामा भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, पी सी पाटील, जिल्हाध्यक्ष संजय महाजन, धरणगाव मंडळाचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, पारधी मंडळाचे तालुकाध्यक्ष किशोर झवर, पंचायत समितीचे माजी सदस्य गजानन सावंत, बाजार समितीचे संचालक ईश्वर चिंधु सावंत, तालुका माजी तालुका सरचिटणीस कन्हैया रायपुरकर, युवा मोर्चाचे चंदन पाटील, विनोद पाटील, दिलीप मराठे, सोनवणे रावसाहेब, श्याम भाऊ पाटील, भगवान गणपत पाटील, राजेंद्र हरी पाटील असंख्य कार्यकर्ते या प्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.
भाजपात यांनी केला प्रवेश
धरणगाव तालुका
संभाजीराव पाटील, भगवान पाटील, वसंतराव पाटील, प्रवीण पाटील, भगवान वामन पाटील, ललित पाटील, विठ्ठल कोळी, संजय शिरसाठ, जयतु पाटील, गोकुळ पाटील, हिलाल पाटील, मिलन सावंत, जगदीश पाटील तर
बिलखेडा
चंद्रकांत शांताराम काटे, चंद्रकांत पाटील, दिलीप पाटील, योगेश पाटील, भाऊसाहेब पाटील, भगवान पाटील, भारत पाटील, संतोष पाटील, सागर पाटील, संदीप पाटील, निलेश पाटील, अमोल साळुंखे, धीरज भदाणे, शरद शिंदे, बापू पाटील, कैलास भदाणे, विजय भदाणे, सागर पाटील, किशोर पाटील, पिंटू पाटील, दगडू पाटील, गणेश पाटील, विजय भामरे, योगेश काटे, दिनेश पवार, मोहन ठाकरे, दीपक ठाकरे, देवराम भिल, भावेश पाटील, भगवान पाटील, राजेंद्र मगर, नारायण पाटील, एकनाथ बडगुजर, भास्कर साळुंखे, अरुण बाविस्कर, लहू बिल, जयेश भामरे, गुणवंत भोपे, पुंडलिक भदाणे, राहुल भामरे, बबलू भामरे, दीपक भामरे, नंदू पाटील, खंडा भाऊ काळे, योगेश चव्हाण, गणेश भदाणे, दीपक भदाणे, सचिन भदाणे, अतुल भदाणे, कैलास पाटील, पप्पू भदाणे, भूषण भदाणे, विजय बडगुजर, रितेश बडगुजर, वाल्मीक अण्णा सोनवणे, विश्वास सोनवणे, रूप लाल सोनवणे, भैय्या सोनवणे, सखाराम भिल्ल, समाधान भिल्ल, दामू भिल्ल आदी यांनी भाजपात प्रवेश केला.