जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील एरंडोल-पारोळा मतदार संघातील कासोदा गावात पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान मंगळवारी रात्री कारमधून दीड कोटीची रोकड जप्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कासोदा गावातील फरकांडे चौफुलीवर पोलिसांचे पथक सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नाकाबंदीसाठी थांबलेले होते. याचवेळी एका क्रेटा कारची तपासणी केली असता पोलिसांना तब्बल एक कोटी 45 लाखाची रोकड सापडली. याबाबत अद्याप याबाबत कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे कळते.
दरम्यान रात्री उशिरापर्यंत ही रोकड नेमकी कोणाची आणि कशासाठी आणली होती?,याचा खुलासा होऊ शकला नव्हता.परंतु या कारमधील रोकड एका बड्या राजकीय नेत्याशी संबंधित असल्याचीही जोरदार चर्चा आहे.