जळगाव (प्रतिनिधी) राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत ‘पेनड्राईव्ह’ बॉम्ब टाकला. राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी हा पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना सुपूर्त केला. गिरीष महाजन यांना अडकवण्यासाठी ही कारस्थानं केल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप नेते गिरीष महाजन यांच्यावर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना मोकामध्ये कसं अडकवायचं याचे ड्राफ्ट सरकारी वकिलांनी करुन दिल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय.
मी पाच वर्ष गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून काम केलं, महाराष्ट्राच्या पोलिसांना मला खऱ्या अर्थाने अभिमान आहे, देशामध्ये कायद्याने नियमाने काम करणारं पोलीस दल हे आपल्या महाराष्ट्रचं पोलीस दल आहे, अशी ख्याती महाराष्ट्र पोलिसांची आहे. पण अलिकडच्या काळात या पोलीस दलाचा गैरवापर हा सरकारी पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सरकार जर षडयंत्र करायला लागलं तर त्या लोकशाहीला अर्थ उरत नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. जी परिस्थिती आज पाहिला मिळतेय, राज्यात काय चाललं आहे. त्यासाठी पेन ड्राईव्ह मी अध्यक्षांना मी सूपुर्त करतो. कशा प्रकाराची कट कारस्थानं सरकारच शिजवतंय, या संदर्भातले सर्व व्हिडिओज या पेन ड्राईव्हमध्ये आहेत असं सागत फडणवीस यांनी पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे दिला.
गिरीश महाजन, फडणवीससह भाजपच्या नेत्यांना अडकण्यासाठी मोठा षड्यंत्र
गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी कशा प्रकारे षड्यंत्र रचले गेले. याबाबत साधरण १०० तासाहून अधिकचे व्हिडीओ, आणि ऑडीओ क्लिपचे पुरावे फडणवीस यांनी सरकारला दिले. तसेच पोलीस आणि सरकारी वकिल या सर्व प्रकरणात सहभागी असल्याने या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा असंही फडणवीस म्हणाले.असे झाल्यास आम्ही कोर्टात जाऊ, असेही फडणवीस म्हणालेय.
सव्वाशे तासांचा पेन ड्राइव्ह केला सादर
सरकारवर विरोधकांना संपवण्याचे आणि खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याचा मोठा आरोप केल्यानंतर फडणवीस यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे एक पेन ड्राइव्ह सोपवला. या पेनड्राइव्हमध्ये सव्वाशे तासांचा डेटा असून सगळे पुरावे यात दडले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या व्हिडिओच्या आणि माहितीच्या आधारे २५ ते ३० वेबसिरीजही तयार होऊ शकतील असेही फडणवीस म्हणाले. या पेन ड्राइव्हमधील जर काही भाग आपण सादर केला तर सभागृहाची इभ्रत जाईल, असे गंभीर स्वरुपाचे विधानही फडणवीस यांनी केला आहे. सरकार कटकारस्थान कशा प्रकारे शिजवत आहे याचा पुरावा या पेनड्राइव्हमध्ये असल्याचा गौप्यस्फोटही फडणवीस यांनी सभागृहात केला.
वृत्त अपडेट होतेय