TheClearNews.Com
Friday, June 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : तरुणीच्या कथित लैंगिक शोषणासह भुसावळमधील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करा ; आ. मंगेश चव्हाण यांची गृहमंत्र्यांकडे मागणी !

विरोधी पक्षाच्या एका आमदाराच्या आशीर्वादाने प्रकरण दडपल्याचा आरोप ; गृहमंत्री फडणवीस यांना दिले पत्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 18, 2023
in गुन्हे, चाळीसगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विरोधी पक्षाच्या आमदाराच्या आशीर्वादाने भुसावळ येथील पोलिसांनी दडपलेले लैंगिक शोषण प्रकरण, त्यात सहभागी युवकांनी ड्रग्ज सेवन केलेले असणे, सदर भुसावळ येथील युवकांना एमडी ड्रग्ज विकणाऱ्यांचे ड्रग्स माफिया ललित पाटील (पानपाटील) याच्याशी असलेल्या संबंधांची चौकशी होणे तसेच ड्रग्स माफिया ललित पाटील (पानपाटील) प्रकरणाचे जळगाव चाळीसगाव कनेक्शन शोधण्याची मागणी एका पत्राद्वारे आमदार मंगेश चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपूर्वी ड्रग्ज माफिया ललित पाटील (पानपाटील) याचा नाशिक येथील एमडी ड्रग्जचा कारखाना पोलिसांनी उध्वस्त केला होता व त्या प्रकरणाच्या अनुषंगाने राज्यभरात सदर ड्रग्ज प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढत अनेकांना अटक देखील केली. राज्य सरकारची ही ड्रग्जविरोधी कारवाई कौतुकास्पद आहे.

READ ALSO

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

या प्रकरणाच्या अनुषंगाने गेल्या महिन्याभरात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काही वक्तव्य केले असून सदर ललित पानपाटीलचे जळगाव व चाळीसगाव कनेक्शन असल्याचे आरोप केले होते. जळगाव जिल्ह्यातील व चाळीसगाव मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी आपल्याला विनंती करतो की, सदर आरोपांच्या अनुषंगाने निष्पक्षपणे चौकशी करण्यात येऊन जळगाव, चाळीसगाव किंवा जे काही कनेक्शन ललित पाटील (पानपाटील) ड्रग्ज प्रकरणाशी असेल ते शोधण्यात यावे.
तसेच गेल्या महिनाभरापूर्वी भुसावळ येथे घडलेल्या एका तरुणीच्या लैंगिक छळाची गंभीर घटना जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या एका आमदाराच्या सांगण्यावरून पोलिसांनी तोडीपानी करून दडपून टाकण्यात आल्याची चर्चा जिल्हाभरात आहे. सदर अमानवीय अश्या घटनेतील युवकांनी एमडी ड्रग्जच्या नशेत आपण हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या जवळ खाजगीत मान्य केले होते.

याबाबत पोलिसांनी सदर एमडी ड्रग्ज कुणाजवळून घेतले याबाबत विचारले असता त्यांनी भुसावळ शहरातील तीन ते चार व्यक्तींची नावे घेतली होती. या सर्व व्यक्ती हे विरोधी पक्षाचे एक आमदार यांच्या जवळचे असून त्यांच्या आशिर्वादाने ते या भागात एमडी ड्रग्जचा अवैध व्यवसाय करतात. तसेच सदर ड्रग्ज विकणारे यांचे कनेक्शन हे थेट ड्रग्ज माफिया ललित पाटील (पानपाटील) याच्याशी असल्याची देखील चर्चा आहे.

तरी कृपया आपण वरील ड्रग्जमाफिया ललित पाटील (पानपाटील) जळगाव, चाळीसगाव कनेक्शन तसेच भुसावळ येथील दाबण्यात आलेले ड्रग्ज प्रकरण या दोन्ही विषयांच्या अनुषंगाने आपण सखोल व उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्यावेत. याबाबत संशयितांची नावे तसेच संपूर्ण घटनाक्रम यांची माहिती मी स्वतः जिल्हा पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्याकडे देणार आहे. सदर भुसावळ येथील प्रकरण गंभीर असून गेल्या महिनाभरातील सीसीटीव्ही फुटेज, संबंधित पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी, संशयित यांचे कॉल डिटेल्स तपासण्यात येऊन त्याअनुषंगाने देखील सखोल तपास करण्यात यावा, असेही आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026
अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात २७ नवीन रूग्णवाहिका दाखल होणार ; आरोग्य व्यवस्था सक्षम होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव कृषी उ. बा.समितीच्या सभापतीपदी भाजपचे जिजाबराव पाटील बिनविरोध !

September 20, 2024

विवाहितेचा विनयभंग करून परिवारातील सदस्यांना मारहाण ; पहूर पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा !

May 30, 2022

भाजप प्रवेशाची चर्चा आणि खडसेंनी घेतली बुधवारी रात्री निकटवर्तीयांची गुप्त बैठक !

April 4, 2024

मेहरून वासीयांची विभागीय आयुक्तांकडे मदतीसाठी आर्त हाक !

November 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group