धरणगाव (प्रतिनिधी) मध्य प्रदेश एनसीबीने (नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो) मध्यरात्री धरणगावातून एकाला घेतले ताब्यात घेतले आहे. मध्य प्रदेशातील इंदोर येथील गांजा तस्करीच्या गुन्ह्यात ही अटक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या संदर्भात अधिक असे की, इंदोर येथे जुलै महिन्यात गांजा तस्करीचा एक गुन्हा दाखल होता. या गांजा तस्करीचे कनेक्शन एरंडोल-कासोदा भागात असल्याची माहिती मध्य प्रदेश एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार काही दिवसापासून मध्य प्रदेश एनसीबीचे अधिकारी-कर्मचारी एरंडोल भागात लक्ष ठेवून होते. तशात एक आरोपी एक धरणगावात असल्याची गुप्त माहिती मध्य प्रदेश एनसीबीला मिळाली. त्यानुसार मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास पथकाने सापळा रचून विजय किसन मोहिते (रा. सरस्वती कॉलनी, एरंडोल, ह.मु. धरणगाव एरंडोल रोड) याला ताब्यात घेतले. या कारवाईत एनसीबीचे दोन अधिकारी एक कर्मचारीचा समावेश होता. तर त्यांना धरणगाव पोलिसांनी सहकार्य केले. दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.