पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावात एका ३५ वर्षीय विवाहितेच्या घरासमोर दोन व्यक्तींनी मारहाण करीत सोन्याची पोत तोडून नुकसान करत विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय विवाहितेच्या घरासमोर दोन जणांनी विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल, असे अश्लील वागणूक देत विनयभंग केला.
या प्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विकास रामदास पाटील व चेतन विकास पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ.पाटील हे करीत आहेत.