जळगाव प्रतिनिधी : घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी क्षितीज देविदास सुरळकर (वय ३०) यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात ठेवलेले २०० ग्रॅम चांदीची प्लेट, वाटी, चमचा, ग्लाससह इनर्व्हटर बॅटरी, पिळ्याचे पातले आणि समई असा एकूण ३१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना दि. १६ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास खोटेनगर स्टॉपजवळील जय हिंद कॉलनीत घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील खोटेनगर बस स्टॉपजवळील जय हिंद कॉलनीत क्षितीज सुरळकर हे वास्तव्यास असून ते खासगी नोकरी करतात. दि. १६ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सुरळकर यांच्या घराचा बंद दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील २०० ग्रॅम वजनाचे चांदीचे ताट, वाटी, चमचा, ग्लाससह पितळाचे पातेले, समई असे अंदाजे १ किलो वजनाचे भांडी चोरुन नेले. ही घटना दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आल्यानंतर सुरळकर यांनी तालुका पोलीसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रवीण पाटील हे करीत आहे.














