जळगाव (प्रतिनिधी) भावाने आपल्याच बहिणीचा विश्वासघात करत तिच्या खात्यातून परस्पर पाच लाख रुपये काढल्याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात न्यायालयाच्या आदेशान्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात शबनम शेख जाकीर पिंजारी (वय ४५ धंदा – घरकाम रा.शिरसोली) यांनी याबाबत जळगाव एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार२६ ऑक्टोंबर २०१७ ते ८ नोव्हेंबर २०१७ च्या दरम्यान, महेमूद समासोउद्दीन पिंजारी, अशपाक समासोउद्दीन पिंजारी (दोघं रा. शिरसोली) यांनी विश्वास संपादन करून बँकेची पासबुकात नोंद करुन आणतो म्हणून पासबुक व एटीएम (ATM) कार्ड घेवून गेलेत. शबनम शेख यांचे पती परदेशात नौकरी असल्यामुळे शबनम शेखच्या खात्यात चांगले पैसे असल्याची दोघांना माहिती होती. यानंतर अशपाक पिंजारी याने परस्पर ATM द्वारे कार्डचा वापर करुन पाच लाख लाख रुपये काढून घेतले. अशपाकला मेहमूद पिंजारी यांनी मदत केली. धक्कदायक म्हणजे शबनम शेख आणि अशपाक हे भाऊ बहिण आहेत.
आपल्या खात्यातील पैसे काढल्याचे लक्षात येताच शबनम शेख आणि त्यांचे पती याबाबत विचारण्यास गेले असता त्या वेळी पैसे परत न करता दोघांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ दमदाटी करत तुकडे-तुकडे करून टाकू तुमचा कोठेही ठिकाणा लागणार नाही, असा दम दिला. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड हे करीत आहेत.