TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

पुरावे नष्ट करणाऱ्या सासूला तीन वर्ष सक्तमजुरी; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

vijay waghmare by vijay waghmare
August 19, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) –  मोठ्या भावाच्या पत्नीवर अत्याचाराचा प्रयत्न करीत असतांना त्याला विरोध केल्याने त्यांचा गळा आवळून खून करणाऱ्या दीर प्रवीण छगन बैरागी (वय २६, रा. कुंझर, ता. चाळीसगाव) याला जन्मठेपेची तर पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सासू लिलाबाई छगन बैरागी (वय ५०) यांना तीन वर्ष सक्तमजुरी शिक्षा सुनावली. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांच्या न्यायालयाने मंगळवार दि. १८ ऑगस्ट रोजी हा निकाल दिला आहे.

भडगाव तालुक्यातील माहेर असलेल्या महिलेची चाळीसगाव तालुक्यातील कुंझर येथील सीआयसीएफमध्ये नोकरीस असलेल्या जवानासोबत २०१३ मध्ये विवाह झाला होता. २०१८ मध्ये विवाहितेचे पती चेन्नई येथे नियुक्तीस होते. तर विवाहिता या सासू, सासरे, दीर प्रवीण बैरागी यांच्यासोबत राहत होती. त्यावेळी विवाहितेचा दीर हा तिच्याकडे वाईट नजरेने बघत होता, तर एकवेळेस विवाहितेचा हात पकडून तिच्याकडे शरिरसुखाची मागणी केली होती. त्यामुळे विवाहिता माहेरी राहत होती. परंतू घटनेच्या काही दिवसांपुर्वीच माहेरच्यांनी समजूत काढून सासरी पाठविले होते. सासरी आल्यानंतर विवाहितेचा दीर तिच्याकडे सतत वाईट नजरेने बघत होता. – दि. ४ जुलै २०१८ रोजी विवाहितेच्या वडीलांना त्यांच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याचे समजल्यानंतर ते तात्काळ कुंझरला जाण्यासाठी निघाले.

READ ALSO

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

मृतदेह बघितल्यानंतर केला गुन्हा दाखल

मुलीचा मृतदेह बघताच त्यांना गळफासामुळे जीभ बाहेर आल्याचे दिसले. तसेच तिच्या अंगावर नखांनी ओरबडले होते तर कपड्यांचे बटन तुटलेले असल्याचे दिसल्यामुळे त्यांनी दि. ४ जुलै २०१८ रोजी पोलिसात तक्रार दिल्याने प्रवीण बैरागीसह त्याची आई लिलाबाई छगन बैरागी व आजलसासूविरुद्ध मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल केला होता.

पुराव्यांच्या आधारावर सुनावली शिक्षा

हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांच्या न्यायालयात चालला. यामध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी पुराव्यांच्या आधारावर प्रभावी युक्तीवाद केल्यामुळे प्रवीण बैरागी याला दोषी ठरवित खून केल्याप्रकरणी जन्मठेप व २० हजारांचा दंड, अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच वर्ष सक्त मजुरी व १० हजारांचा दंड, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्ष सक्त मजुरी व पाच हजारांचा दंड तर पुरावे नष्ट केल्याप्रकरणी लिलाबाई छगन बैरागी (वय ५०) यांना तीन वर्ष सक्तमजुरी व ५ हजारांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच दंडाच्या रकमेतून ३५ हजार रुपये मयत विवाहितेच्या मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

गळा आवळल्याचे अहवालातून झाले स्पष्ट

विवाहितेच्या मृतदेहाचे धुळे येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन केले होते. शवविच्छेदन अहवालात विवाहितेला मासीक पाळी सुरु होती तर तिचा गळा आवळून खून केल्याचा अहवाल डॉ. आर. के गढरी यांनी दिला होता. डॉक्टरांनी विवाहितेच्या गळ्यावरील वर्णातील बारीक कण जमा करुन ते न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्यामध्ये गुन्ह्यात वापरलेली दोरी आणि कण त्याच दोरीचे असल्याचे निष्पन्न झाले होते.

पीडितेच्या मुलीसह तपासधिकाऱ्यांची साक्ष ठरली महत्वपुर्ण

पोलिसांच्या तपासात आरोपी प्रवीण बैरागी व त्याची आई यांनी खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच घटनेवेळी मयताजवळ तिची मुलगी झोपलेली होती. घटनेवेळी तिला जाग आल्यामुळे मुलीसह विवाहितेचे वडील, पंच, तपासधिकारी पोनि दिलीप शिरसाठ, जयपाल हिरे, पीएसआय हेमंत शिंदे, यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. पैरवी अधिकारी म्हणून अमोल पाटील यांनी कामकाज पाहिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonBrother-in-law sentenced to life imprisonment for murder following attempted sexual assault

Related Posts

जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
Next Post

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना विम्याची रक्कम तातडीने अदा करा !

February 4, 2024

मातृशक्ती जिजाऊ फाउंडेशनतर्फे जिल्हा उद्योग केंद्राला सॅनिटाइझर डिस्पेन्सर भेट !

May 8, 2021

पोलीस कॉन्स्टेबलच्या घरी चोरट्यानी मारला डल्ला !

May 28, 2021

अंबादास दानवेंचा सभागृहात पेनड्राईव्ह बॉम्ब ; सोमय्यांचे आठ तासांचे व्हिडीओ असल्याचा दावा !

July 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group