TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस देवेंद्र फडणवीसांनी दाखवावे : नाना पटोले

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सोनिया गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणा-या नरेंद्र मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. त्यांनी मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

कोरोनाला गांभीर्याने न घेतल्यानेच कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. खा. राहुल गांधी यांनी १२ फेब्रुवारी २०२० रोजीच कोरोना त्सुनामी सारखे संकट असल्याचा इशारा दिला होता परंतु मोदींपासून देवेंद्र फडणवीसापर्यंत भाजप नेत्यांनी आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही असे म्हणत दुर्लक्ष केले. परिणामी आज देशात दररोज ४ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण तसेच ४ हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. याला सर्वस्वी केंद्रातील भाजप सरकारचा अहंकार आणि भोंगळपणा जबाबदार आहे. सोनिया गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणा-या नरेंद्र मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. त्यांनी मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवावे, असे घणाघाती उत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असून, मोदी सरकारने यासंदर्भातील सर्व अधिकार केंद्राकडे घेऊन राज्यांना रामभरोसे सोडले. मोदींकडे ठोस धोरण नाही, आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याने भाजप नेते सैरभैर झालेत. पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघात मृतदेह जाळण्यासाठी जागा नाही हे विदारक दृश्य जगभरातील माध्यमे दाखवत आहेत. ७० वर्षांत कधी भारताची झाली नव्हती, एवढी नाचक्की मोदींच्या मनमानी कारभारामुळे झाली आहे, असंही नाना पटोले म्हणालेत.

मोदी सरकारने राज्यांना भरभरून रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन आणि वैद्यकीय मदत पुरवली, असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस खोटारडे आहेत. यावर सर्वोच्च न्यायालय आणि देशातील अनेक उच्च न्यायालयांनी शिक्कामोर्तब केले. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत टास्क फोर्स नेमून सर्वोच्च न्यायालयाने मोदींच्या अकार्यक्षमतेवर शिक्कामोर्तबच केले. पीएम केअरमधून ऑक्सिजन प्लँट उभारण्याच्या फक्त घोषणा केल्या प्रत्यक्षात केंद्राने आजपर्यंत महाराष्ट्रात एकही ऑक्सिजन प्लँट उभारला नाही. महाराष्ट्राची रोजची ऑक्सिजनची गरज १७५० मे. टन आहे. यातील १२०० मे टन महाराष्ट्रात निर्माण केला जातो, यात मोदी सरकारचे काही योगदान नाही. ५५० मे टन अधिकचा ऑक्सिजन हवा होता, तेही मोदी सरकार पुरवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. देशातील जनता रेमडेसिव्हीर मागत असताना भाजपचे नेते रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करण्यात व्यस्त होते. स्वतः देवेंद्र फडणवीसही एका काळाबाजार करणा-या कंपनीच्या लोकांना वाचविण्यासाठी मध्यरात्री पोलीस स्टेशनला जाऊन गोंधळ घालत होते. रेमडेसिव्हीर साठेबाजीप्रकरणी अहमदनगरच्या भाजप खासदाराविरोधात कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेत. पीएम केअर फंडातून दिलेल्या व्हेंटिलेटरमध्येही घोटाळा असून, अनेक व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असल्याने वापराविना धुळखात पडून आहेत.

जग लसीकरणात व्यस्त असताना मोदी निवडणूक प्रचारात व्यस्त होते. मोदी सरकारकडे लसीकरणाचे राष्ट्रीय धोरणच नाही. लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्रे बंद आहेत. लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा केली असताना केंद्राला १५० रुपये, राज्यांना ४०० रुपयांना, खासगी व्यक्तींना ६०० रुपयांना ती विकत का घ्यावी लागत आहे. एवढे अडथळे असतानाही महाराष्ट्राने आतापर्यंत विक्रमी १ कोटी ९५ लाख ३१ हजार नागरिकांचे लसीकरण केले, जे देशात सर्वात जास्त आहे. दररोज सहा लाख नागरिकांच्या लसीकरणाची महाराष्ट्राची क्षमता आहे. वेस्टेजही देशात सर्वात कमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नीती आयोगासह जागतिक स्तरावरही मुंबईच्या कोरोना नियंत्रण मॉडेलचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने नोंदणीकृत रिक्षा चालक, कामगारांसह आर्थिक दुर्बल घटकांसाठी प्रत्येकी १५०० रुपयांची थेट मदत देण्यासाठी ५४७६ कोटींचे पॅकेज दिले. कोरोना काळात गोरगरिबांना मोफत शिवभोजन थाळी दिली जात आहे. सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे मोफत अन्नधान्य देण्यात येत आहे. ही सर्व मदत लाभार्थ्यांना पोहोचली आहे. मोदी सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पोकळ पॅकेजचे काय झाले? हे फडणवीसांनी सांगावे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिण्याऐवजी फडणवीसांनी नमामी गंगेला शवामी गंगे बनविणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, गोव्यात ऑक्सिजन अभावी रूग्ण तडफडून मरत आहेत. त्या गोव्याचे मुख्यमंत्री, गुजरातमध्ये लाखो लोकांच्या मृत्यूचे आकडे लपवले जात आहेत. त्या गुजरातचे मुख्यमंत्री आणि या सर्वांचे पालक ज्यांच्या गलथानपणामुळे देशात कोरोना स्थिती बिकट झाली आहे, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहायला हवे होते, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना युनोत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी अटलबिहारी वाजपेयींना दिली होती. गुजरात भूकंपानंतर आपत्ती व्यवस्थानाचे देशाचे प्रमुख म्हणून शरद पवार यांच्यावर अटलबिहारी वाजपेयी यांनी जबाबदारी दिली होती. राष्ट्रीय आपत्तीकाळात सर्वांनी सोबत येऊन काम करण्याची आपल्या देशाची समृद्ध परंपरा आहे. या परंपरेचे पाईक म्हणून संकट काळात आपण जे गलिच्छ राजकारण करत आहोत ते योग्य आहे का? याचे आत्मपरीक्षण फडणवीसांनी करावे, असेही पटोले म्हणाले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या शरीरात 'हा' नवा व्हायरस : आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात ‘या’ ठिकाणी आहे, श्री गणेश विसर्जनास बंदी !

September 17, 2021

१४ व्या वर्षी झालं होतं लैंगिक शोषण; आमिरच्या मुलीचा धक्कादायक खुलासा

November 2, 2020

धक्कादायक ! चिमुकल्यासह विहिरीत उडी घेत आईची आत्महत्या

September 11, 2021

अमळनेरात बजाज फायनान्सच्या कार्यालयात घुसून तोडफोड !

January 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group