जळगाव (प्रतिनिधी) शहरातील निवृत्ती नगरातील एका घरात घरफोडी करीत अज्ञात चोरट्यांनी ६६ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जळगाव – धुळे महामार्गावर असलेल्या निवृत्ती नगरातील आसाराम बापू यांच्या आश्रमजवळील रहिवासी देवेद्नसिंग चंद्रसिंग जाधव(वय ३६) रा.कल्याणी होळ ता. धरणगाव) यांच्या मालकीच्या घर आहे. दि २८ रोजी अनोळखी इसमांनी प्रवेश करीत घरातील सोन्या-चांदीच्या दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जाधव यांनी जिल्हा पेठ पोलीस स्थानक गाठत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.मनोज बंकट हे करीत आहेत.