जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मोहननगर वृंदावन गार्डन जवळील एका घरातून अज्ञात चोरट्याने ५८ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात उज्ज्वल दत्तात्रय ठाकूर (वय २६, रा. प्लॉट नं ९३ मोहन नगर, वृंदावन गार्डन जवळ, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १९ एप्रिल २०२२ रोजी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून २० हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या अंगठ्या, २० हजार रुपये किंमतीचे १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, १० हजार रुपये किंमतीचे २.५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या ८ हजार ५०० रुपये किंमतीचे ३ ग्रॅम वजनाचे कानातले टोंगल, असा एकूण ५८ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोहेकॉ सुनील चौधरी करीत आहेत.