मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील सुकळी या गावातील एका घरातून रात्रीच्या सुमारास ६० हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि , तालुक्यातील सुकळी या गावातील रहिवासी विजय देविदास पाटील(वय ४२) हे शेती करून आपला परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दि २२ रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास अनोळखी चोरटयांनी घरात प्रवेष करीत त्यांच्या मालकीचा ४३ हजार ५०० रुपये किमतीचा एलईडी टीव्ही सोबत ३ मोबाईल लंपास केल्याची घटना सकाळी उघडकीस आल्याने त्यांनी तात्काळ मुक्ताईनगर पोलीस स्थानकात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.ना विकास नायासें हे करीत आहेत.
















