जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात चोरी, घरफोडी घटनांमध्ये वाढ होत आहे. रोज चोरीच्या घटना घडत आहे. जळगाव जिल्ह्यात दोन ठिकाणी घरफोडी झाली असून तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर चोपडा तालुक्यातील देवगाव येथे एका ठिकाणी घराची कडी काढून चोरीची घटना घडली.
यासंदर्भात अधिक असे की, चोपडा तालुक्यातील देवगाव येथील रमेश मंसाराम चांदसरे (वय ७२ देवगाव ता. चोपडा) हे बाहेर गावी गेले असता त्याच्या घराचा अज्ञात चोरट्याने कडीकोयंडा तोडून रोख रक्कम, ६ ग्रॅम सोन्याची अंगठी, एलसीडी टीव्ही, असा एकूण ६८ हजार रुपयांची चोरी झाली. याप्रकरणी रमेश चांदसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अडावद पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल तायडे करीत आहेत.
म्हसावद येथील ज्वेलर्सचे दुकान फोडले
यासंदर्भात अधिक असे की, नाना तुकाराम सोनार (वय ५०, रा. म्हसावद, वाणी गल्ली, ता. जि. जळगाव) यांच्या म्हसावद बोरनार रोड वरील विविध कार्यकारी सोसायटीचे शॉपींग कॉम्पलेक्स मधील दुकान नंबर ०४ मध्ये स्वाती ज्वेलर्सचे लोखंडी चॅनल गेट, शटरचे दरवाज्याचे कळी कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश करुन ज्वेलर्सच्या दुकानातील सोन्या चांदीचे दागीने, रोख रुपये व साहीत्य असा एकुण ५६ हजार ३०० रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी नाना तुकाराम सोनार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ राजेंद्र उगले करीत आहेत.
यावल येथे घरफोडी, सोन्या-चांदीसह रोकड लंपास
यासंदर्भात अधिक असे की, तेजभान अरुण पाटील (वय ३५ रा. मनवेल ता. यावल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. २८ जानेवारी २०२२ अज्ञात चोरट्याने राहते घरात प्रवेश करून २ हजार रोख रक्कम, २५ हजार रोख किंमतीचे चांदीचे ताट, वाटी, समई, देव, ताब्याग्लास, चांदीच्या वस्तू ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे चिप, सुटकेस त्यामधील महत्त्वाची कागदपत्रे, कपडे असा एकूण १ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउप निरिक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.
मालेगाव ते हिरापूर प्रवासादरम्यान महिलेचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी
यासंदर्भात अधिक असे की, दि. २७ जानेवारी २०२० रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मालेगाव ते हिरापूर दरम्यान अंकिता प्रतीक पाटील (वय २१ रा. पोलीस कॉटर ब्लॉक नं २६५ ता. जि अहमदनगर) या व त्यांच्या आई मालेगाव येथून हिरापूर येथे रिक्षाने येत असताना प्रवासादरम्यान, एका अज्ञात चोरट्याने बॅगच्या आतील कापडी कप्पा कापून ५ लाख ३२ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी अंकिता प्रतीक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन आमोदकर करीत आहेत
शानबाग परिसरातून मोटार सायकल चोरी
यासंदर्भात अधिक असे की, दि. २३ जानेवारी २०२२ रोजी प्लॉट नं. २१ विद्या नगर, शानबाग हॉलच्या मागे दीपक वासुदेव फालक यांच्या वडिलांच्या मालकीची हिरो होन्डा कंपनीची स्पेलेंडर प्लस (MH १९ AJ ११०१) काळ्या व निळ्या रंगाची मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी दीपक वासुदेव फालक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना सुनील रमेश पाटील करीत आहेत.