TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : मालमत्तेचे खोटे मुल्यांकन करून कमी किंमतीत केल्या खरेदी ; १६ कोटी ६७ लाखाचा अपहार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 19, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव, बीएचआर घोटाळा
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआरच्या मालमत्तेचे बाजारभावापेक्षा कमी किंमतीचे खोटे मुल्यांकन करून घेण्यात आले होते. सदरच्या मालमत्ता अत्यंत कमी किंमतीत प्रमुख संशयित सुनील झंवर याने आपल्या संस्था तसेच नातेवाईकांच्या नावाने खरेदी केल्या. तसेच खरेदीच्या दाखवलेल्या कमी रकमेचा मोबदला सुध्दा पुर्णपणे न भरता त्यात मुदतठेवीच्या पावत्या बेकायदेशिरित्या वळत्या करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर, यात १६ कोटी ६७ लाख ३१ हजार ७०२ रुपयांचा संगनमताने व पूर्वनियोजित कटानुसार अपहार केल्याचेही दोषारोप पत्रातून समोर आले आहे.

 

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

सुनिल झंवरच्या कार्यालयातून चालायचे बीएचआरचे बेकायदेशीर कामकाज

 

पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या तपासात बीएचआर संस्थेच्या मालमत्तेचा अपहार व त्यातील निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत अनेक धक्कादायक मुद्दे समोर आले आहेत. त्यानुसार कुणाल शहाच्या मदतीने जितेंद्र फडारे, सुजीत वाणी यांनी बीएचआर या वित्तीय संस्थेच्या ठेवी परत करणे आवश्यक व बंधनकारक असताना जाणीवपूर्वक गैरहेतूने व गैरउदीष्टाने व एक विचाराने पूर्व नियोजित कटानुसार ठेवीदारांचा पैसा, कर्जदाराच्या मालमत्ता विक्री करून व त्यांच्याकडून कर्ज रक्कम वसूल करून परत करणे आवश्यक असताना गैरहेतूने परत केलेल्या नाहीत. या ठेवी परत न करण्यासाठी संशयित आरोपी जितेंद्र कंडारे, सुजित वाणी, सुनिल झंवर, महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम सांकला, कुणाल शहा, प्रकाश वाणी, सूरज झंवर, माहेश्वरी व इतर व्यक्तींनी संगनमत करून पूर्व नियोजित कटानुसार बीएचआर येथे कुणाल शहा मार्फत इन्स्टॉल केलेले सॉफ्टवेअर सुनिल झंवर व सुरज झंवर यांच्या कार्यालयात इन्स्टॉल केले. तसेच महावीर जैन मार्फत सदरचे सॉफ्टवेअर कसे वापरायचे? हे तेथील कर्मचा-यास समजावून देवून सुनिल झंवर याच्या कार्यालयातून बीएचआरचे बेकायदेशीर कामकाज सुरू केले.

 

मालमत्ता विक्री बाबत ई-टेंडरिंग काढल्याचे भासवले

 

बीएचआर संस्थेच्या मालमत्ता विक्री करीता केंद्र महाराष्ट्र शासनाच्या नॅशनल इन्फोरमेंटीक सेंटर (एनआयसी) च्या वेबसाईट, वेगवेगळ्या विभागाच्या उपलब्ध वेबसाईट, तसेच शासनाकडून प्राधिकृत केलेल्या इतर आस्थापनाच्या वेबसाईट उपलब्ध असताना व यात कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही. तसेच या वेबसाईट जास्तीत जास्त लोकांना माहीत आहे, असे असताना संशयितांनी पूर्ण नियंत्रण राहील अशी खाजगी वेबसाईट www.bhronline.in कुणाल शहा याच्या मदतीने बीएचआरच्या मालमत्ता अपहार करण्यासाठी तयार करून घेतली. या वेबसाईटचा पासवर्ड व सोर्सकोड कुणाल शहा, जितेंद्र कंडारे, सुनिल झंवर, सुरज झंवर, महावीर जैन व इतर आरोपींना माहित असल्याने सुनिल झंवर व सूरज झंवर यांनी पूर्वनियोजित कटानुसार बीएचआरच्या मालमत्ता विक्री बाबत ई-टेंडरिंग काढल्याचे भासवून बहुतांशी ई-टेंडरिंगमध्ये आपल्या संस्था व त्यांचे शालेय पोषण आहाराचे कामासाठी वाहन पुरविणारे ठेकेदार, पोषण आहार पुरविणारे सब ठेकेदार यांच्या बँक खात्यात साई मार्केटिंग अॅन्ड ट्रेडींग कंपनीच्या खात्यातून पैसा वळता करून त्यांच्या मार्फतीने ई-टेंडर प्रक्रिया पारदर्शी आहे, असे भासविण्यासाठी त्यांनाही टेंडर भरायला लावले.

 

कमी किंमतीचे खोटे मुल्यांकन करून मालमत्ता खरेदी

 

बीएचआरच्या मालमत्ता बाजारभावापेक्षा कमी किंमतीचे खोटे मुल्यांकन करून घेतले. सदरच्या मालमत्ता अत्यंत कमी किंमतीत सुनिल झंवर यांच्या संस्था व त्याचे नातेवाईक योगेश लढ्ढाच्या नावे खरेदी करून, खरेदीचा दाखवलेला कमी रकमेचा मोबदला सुध्दा पुर्णपणे न भरता त्यात मुदतठेवीच्या पावत्या बेकायदेशिरित्या वळत्याकरून या मालमत्ता रुपये १६,६७,३१,७०२/- चा संगनमताने व पुर्वनियोजित कटानुसार अपहार केला. तसेच तपासात असे निष्पन्न झाले आहे की, महाराष्ट्रात संपूर्ण राज्यात प्रसारीत होणारे मराठी व इंग्रजी वृत्तपत्रात मालमत्ता विक्रीची जाहिरात देणे आवश्यक असताना केवळ मराठी वृत्तपत्रात जाहिरात दिल्याचे दाखविले, सदरची जाहीरात ही बीएचआरमध्ये तयार करणे आवश्यक असताना ती प्रत्यक्षात सुनिल झंवर याचे कार्यालयात तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

मालमत्ता विक्रीचा सर्व तपशिल आढळला हार्ड डिक्समध्ये

तपासात असे निष्पन्न झाले आहे की, बीएचआर संस्थेच्या मालमत्ता विक्रीचा सर्व तपशिल हा केवळ बीएचआर कार्यालयातच उपलब्ध होणे आवश्यक असताना तो कारण नसताना सुनिल झंवर व सुरज झंवर यांच्या कार्यालयातून जप्त केलेल्या हार्ड डिस्कमध्ये मिळून आला आहे. तसेच तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, जितेंद्र कंडारे, सुजीत वाणी, सुनिल झंवर, सुरज झंवर, महावीर जैन व इतर यांना वेबसाईटचा सोर्स कोड व पासवर्ड उपलब्ध होता. तसेच त्यांना निविदा भरणा-यांची सर्व माहिती मिळत होती. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, सुनिल झंवर व सुरज झंवर यांच्या श्री साई मार्केटिंग अॅन्ड ट्रेडिंग कंपनी मधून शालेय पोषण आहारासाठी वाहन पुरविणारे ठेकेदार व सबठेकेदार यांचे खात्यात पैसे वळते करुन संशयितांनी त्याच्या मार्फतीने मालमत्ता खरेदी करुन व ई निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबविल्याचे भासविले.

 

मालमत्तेच्या मोबदल्यात पावत्यांची रक्कम जमा केल्याच्या खोटया नोंदी

 

तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, मालमत्तेची किंमत जास्त असताना अल्प दराचे व्हॅल्युएशन करुन कमी किंमतीत मालमत्ता खरेदी केल्या आहेत. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की मालमत्तेची निविदा प्रक्रियेची जाहिरात प्रसिध्द होणेपुर्वीच आरोपी सुनिल झंवर, जितेंद्र कंडारे, सुरज झंवर यांनी पुर्वनियोजीत कटानुसार मुदत ठेवीच्या पावत्या गोळा करुन ठेवल्या होत्या व या मुदत ठेवीच्या पावत्यांची रक्कम केवळ बीएचआर संस्थेच्या रेकॉर्डला व संगणकावर दिलेली दाखविली व मालमत्तेच्या मोबदल्यात या ठेव पावत्यांची रक्कम जमा केल्याचे केवळ खोटया नोंदी घेवून दर्शविण्यात आले आहे.

 

विजय वाघमारे (9284058683)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
Next Post

तालिबानचा मोठा निर्णय, भारताला धक्का देत आयात- निर्यातीवर घातली बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी ; पिडीत विद्यार्थिनीच्या भावाने एकाला चोपले !

August 14, 2023

“मुख्यमंत्री दु:खी आहेत कारण.. ” ; मुख्यमंत्रिपदावरून गडकरींची जोरदार टोलेबाजी

September 14, 2021

अमळनेरात आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण

March 12, 2025

संतापजनक : १७ वर्षीय मुलीला डांबून ठेवत सलग २२ दिवस सामूहिक बलात्कार !

October 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group