पाळधी (प्रतिनिधी) राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या संदर्भात भाजपाचे प्रदेश सचिव निलेश नारायण राणे यांनी अतिशय खालच्या दर्जाचे आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्याच्या निषेधार्थ पाळधी येथील मुस्लिम समाजाच्यावतीने निलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी अल्पसंख्याक आघाडी प्रमुख दानिश पठाण व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.