जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) तालुक्यातील एका तरुणाला क्रेडीट कार्ड ऑफरची बतावणी करून साडेसात लाखांत गंडवल्याची (Online Fraud) घटना घडली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात (Jalgaon Cyber Police)अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime News)
या संदर्भात अधिक असे की, मिलींद प्रकाश पाटील (वय- २३ वर्ष, व्यवसाय- खाजगी नोकरी, रा. मंगरुळ, ता. अमळनेर जि. जळगाव. हं.मु. विठ्ठल महाराज मंदिराजवळ भोयर वाडी,मान,हिंजेवाडी, पुणे) या तरुणाला १८ ते ते १९ जानेवारीच्या दरम्यान ८५३५०२६१५६ या मोबाईल वरुन एक फोन आला. समोरून बोलणाऱ्या अज्ञात इसमाने पर्सनल लोन व क्रेडिट कार्डच्या ऑफर बाबत सांगून मिलिंद पाटील यांचा विश्वास संपादन केला. यानंतर ओटीपी (OTP) घेऊन त्यांच्या नावावर तब्बल ६ लाख ६९ हजार २६० रुपये एवढे पर्सनल लोन घेतले. एवढेच नव्हे अतर लोनची संपूर्ण रक्कम व त्यांच्या बँक खात्यातील ९० हजार ७४० रुपये असे एकूण ७ लाख ६० हजार रुपये एवढी रक्कम अज्ञात भामट्याने स्वतःच्या ट्रान्सफर करून घेतली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे हे करीत आहेत.