मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. परंतू मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा सवाल रोज विरोधकांकडून विचारण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात ५ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी ३० जून रोजी महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिंदे सरकारने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे ७५१ सरकारी आदेश जारी केले असून त्यापैकी १०० हून अधिक आदेश हे एकट्या आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. शिंदे व फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात १५ मंत्री शपथ घेऊ शकतात. भाजप गटातील ८ आणि एकनाथ शिंदे गटातील ७ मंत्री शपथ घेणार असल्याचे समजते आहे. शिंदे सरकारला एक महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाला, मात्र सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सर्व कामकाज पाहत आहेत. दोघे जण सर्व कारभार पाहत असल्याने एक दुजे के लिए असाच यांचा कार्यक्रम दोघांचा चाललेला आहे, अशी ही टीका विरोधकांनी केली आहे.
भाजपाकडून ही नावे चर्चेत
चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, प्रविण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे
शिंदे गटाकडून ही नावे चर्चेत
गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभुराज देसाई, दादा भुसे, अब्दुल सत्तार