पुणे (वृत्तसंस्था) मध्यरात्री नदीपात्रालगत असलेल्या रस्त्यावरून जाताना वाहन चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने एक चारचाकी पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आली आहे. मात्र, वेळीच अग्निशामक दलाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी झाल्याने पाच जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले. वंचिका लालवाणी (13), प्रिया लालवाणी (२२, कुणाल लालवाणी (28), कपिल लालवाणी (२१) आणि कृष्णा लालवाणी (८) हे सर्व राहणार पालघर अशी पाण्यात अडकलेल्यांची नावे आहेत.
मुंबईतील काही जण त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्यात आले होते. त्यांना भेटून हे सर्व जण त्यांच्या खासगी वाहनाने मुंबईकडे निघाले होते. गुरुवारी मध्यरात्री १ वाजून ४६ मिनीटांनी एस एम जोशी पुलाखालील नदी पात्राच्या रस्त्यावर टाटा टिगोरो (MH 48 6151) कार पाण्यात वाहून जात असल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर रोप, लाईफ जॅकेटच्या साह्याने नदी पात्रात उतरून या जवानांनी कारमधील पाचही जणांना वाचविले. दिलासा देणारी बाब म्हणजे ही कार पाणी कमी असल्याने काही अंतरावर जाऊन थांबली होती. अडकलेल्या पाच व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही कार पालघरची होती, ते रक्षाबंधन असल्याने पुण्यात नातेवाईकांकडे आले होते. रजपूत विटभट्टी कडून ते पात्रातील रस्त्याने जात होत. त्यांची कार गरवारे पुलाखाली अडकली होती. एरऺडवणा, जनता वसाहत सेंट्रल फायर स्टेशनची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि या मोठी दुर्घटना टळली. ड्रायव्हर ज्ञानेश्वर खेडेकर, फायरमन किशोर बने, दिलीप घडशी, मदतनीस सऺदीप कार्ले यांनी मदत केली.