धरणगाव (प्रतिनिधी) आपण आजवरफक्त आणि फक्त समाजकार्य आणि विकासकामांच्या बळावर वाटचाल केली आहे. यात आपण कधी जाती-पातीचे राजकारण केले नाही, आणि कधी विकास कामांमध्ये जात आडवी येऊ दिली नाही. याचमुळे भोद सारख्या गावातून मला तब्बल ९८ टक्के मतदान होत असून या प्रेमातून उतराई होण्याचा प्रयत्न मी कामांच्या माध्यमातून केला आहे. गावात सर्वतोपरी कामे करण्यात आली असून उर्वरित कामे लवकरच करण्यात येतील असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव तालुक्यातील भोद येथे विकासकामांचे भूमीपुजन आणि लोकार्पणच्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील हे होते.
धरणगाव तालुक्यातील भोद गावी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण व भूमिपुजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भोद हे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर प्रेम करणारे गाव असून याची प्रचिती या कार्यक्रमाप्रसंगी आली. या कार्यक्रमाला गावातील मान्यवरांसह बहुतांश आबालवृध्दांची हजेरी होती. याप्रसंगी सावित्रीबाई फुले अंगणवाडी लोकार्पण , पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन, गाव अंतर्गत विकास कामांचे लोकार्पण व मुलभूत सुविधा (२५१५) अंतर्गत फाटा ते गावापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी आपल्या मनोगतात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कोणताही भेद न मागत विकासकामांचा सपाटा लावला असल्याचे प्रतिपादन केले. तालुका प्रमुख गजानन पाटील म्हणाले की, गुलाबभाऊ हे माणसे जोडणारा नेता होत. ते घेणारे नसून देणारे नेतृत्व असल्याचे त्यांनी नमूद केले. तर भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाषअण्णा पाटील यांनी आपल्या मनोगतात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासोबत आम्ही भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे खांद्याला खांदा लाऊन काम करणार असल्याचे सांगितले.
ना. गुलाबराव पाटील हे भोदकरांनी केलेली कार्यक्रमाला उपस्थितांची गर्दी पाहून भारावले. त्यांनी गावातील पहिले शिवसैनिक दिवंगत उज्वल पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. पदे येतात आणि जातात मात्र ऋणानुबंध कायम राहतात असे सांगत त्यांनी आपण भोदकरांच्या पाठीशी कायम उभे राहू याची ग्वाही दिली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख निलेश पाटील, उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, तालुकाप्रमुख गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, दामूअण्णा पाटील, माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, सरपंच राजू पाटील, ग्रा.पं. सदस्य सुभाष पाटील, रवींद्र पाटील, साहेबराव भिल, संजय पाटील, जगन भिल, सुरेश भिल, खालील शेख, हरचंद पाटील, संभाजी पाटील, गजानन बापू सतखेडेकर, तुकाराम नाना, डी.ओ. पाटील, सचिन पवार, भाजपाचे संजय महाजन , सुभाषअण्णा पाटील, शहर प्रमुख विलास महाजन, मोतीलाल पाटील, रमेश बापू पाटील, सतीश देवकर , पप्पू भावे, भरत पाटील, युवा सेनेचे भैया महाजन, पवन पाटील, आबा माळी, दीपक भदाणे, शेतकरी सेनेचे विनायक महाजन, मंगल पाटील, संचालक संभाजी चव्हाण, नाना भालेराव, भगवान पाटील, विभाग प्रमुख सोपान बोरसे,मार्केटचे संचालक प्रेमराज पाटील, नाना बडगुजर, धर्मराज पाटील, परिसरातील सरपंच प्रिया इंगळे व शेकडो शिवसैनिक व युवासेना कार्यकर्ते.. सर्व ग्रा.पं. सदस्य, सोसायटीचे संचालक, यांच्यासह परीसरातील सरपंच व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सरपंच राजू पाटील यांनी केलेल्या विकास कामांची माहिती विषद करून भरघोस निधी दिल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी गाव खंबीर उभे राहील अशी ग्वाही दिली. सूत्रसंचालन प्रशांत पाटील सर यांनी केले. आभार पितांबर पवार यांनी मांनले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन भोद येथील ग्रामपंचायत व शिवसेना व युवसेना पदाधिकारी यांनी केले होते.