पुणे (वृत्तसंस्था) धुळेसह जळगाव जिल्ह्यातही येत्या 3-4 तासांत वादळी पावसाचा अंदाज वर्तवणारं ट्विट पुण्याच्या प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख वैज्ञानिक के. एस. होसाळीकर यांनी केले आहे.
राज्यातील काही भागात पुढील तीन-चार तासात वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. धुळ्यात काल जोरदार गारपीटही झाली, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालं आहे. होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं की, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यावर तीव्र दाट ढगांची गर्दी झाली आहे. तसेच नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, बीड, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि विदर्भातील पश्चिम भाग, मराठवाड्यातही दाट ढग दाटून आले आहेत. काल मुंबई-पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. धुळ्यात काल जोरदार गारपीटही झाली, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, राज्यातील या सर्व भागात पुढील तीन ते चार तासात गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत पडला आहे.