चाळीसगाव (प्रतिनिधी) सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे सालाबाद प्रमाणे यंदाही चाळीसगाव तालुक्यातील दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या शिलेदारांनी सहकुटुंब सहपरिवार मित्र परिवार यांच्यासोबत जमुन गडावर ध्वजारोहण करून गड पूजन केले तसेच खंडोबा देवाची तळी भरून भंडारा उधळीत मल्हारगड दसरा महोत्सव साजरा केला.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे चाळीसगाव तालुक्यातील सिलेदार सहभागी झाले होते. सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत मल्हार गडावर गेल्या सहा वर्षापासून संवर्धनाची अनेक कामे करून मल्हारगड आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी परिचित गड म्हणून प्रसिद्ध केला आहे. मल्हार गडाची माहिती लोकांपर्यंत जावी आणि या किल्ल्यावर दुर्गप्रेमींनी भेट द्यावी किल्ल्याचा इतिहास लोकांना माहिती व्हावी, या दृष्टिकोनातून सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव विभागाने गेल्या सहा वर्षापासून मल्हारगड दसरा महोत्सव सुरू करून मल्हार गडावर हा उत्सव सुरू केला आहे. संबळाच्या तालावर गोंधळ यांच्या गीतांचा गजर करीत पारंपारिक पद्धतीने हा महोत्सव यावर्षी साजरा करण्यात आल्याने पारंपारिक कलाकारांनी याचा आनंद देखील घेतला.