आव्हानी ता. धरणगाव (प्रतिनिधी) दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने आव्हानी गावातील समिधा प्रतिष्ठान, शिव स्मारक समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे ढोल – ताशे वाजवून व नाचून गाऊन साजरी न करता रक्तदान करून साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिव स्मारक समिति व समिधा प्रतिष्ठान आव्हानी आणि रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष सीमेवर जाऊन देश सेवा न करता घरीच राहून कर्तव्यपूर्ती सुद्धा करता येऊ शकते. याचे एक सुंदर उदाहरण गावातील व पंचक्रोशीतील तरुणांनी दाखवून दिले. एकूण ४० रक्तदात्यांनी रक्तदान करून यात मोलाच्या सहभाग घेतला. यावेळी आयोजक राकेश गोकुळ गोसावी, ज्ञानेश्वर गुलाब पाटील, तुषार भिकन पाटील, मनोहर बळीराम पाटील, रवींद्र दिलीप पाटील, भूपेंद्र वामन पाटील, परशांत पितांबर पाटील, संदीप लक्ष्मण पाटील, दगा मिस्तरी, रोहित भगवान पाटील आदी उपस्थित होते.