धरणगांव (प्रतिनिधी) शिंपी समाजाचा कडून संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने श्री संत नामदेव महाराज प्रतिमेचे व ग्रंथाचे पूजन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्य अध्यक्ष व नगरसेवक भानुदास आप्पा विसावे व समाजाचे ता. अध्यक्ष जितेंद्र जगताप, व समाजाचे अध्यक्ष मोहन मांडगे, उपाध्यक्ष किरण सोनवणी, सेक्रेटरी मनोज नेरपगार यांच्या हस्ते करण्यात आले.
भानुदास आप्पा विसावे यांनी संत नामदेव महाराज विषयी विचार मनोगत व्यक्त केले शेवटी २६/११ हल्ल्यात शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. व तसेच या कार्यक्रमावेळी प्रभाकर आण्णा नेरपगार, विलास मांडगे, मुकुंद कपुरे, राजेंद्र सोनवणी, विवेक मांडगे, विशाल नेरपगार, योगेश मांडगे, राज जगताप, रमेश जगताप, तसेच महिला अध्यक्ष सौ. शकुंतला जगताप, वत्सला जगताप, उर्मिला कापुरे, रजनी मांडगे, शैला सोनवणी, वंदना मांडगे, मनिषा जगताप इत्यादि समाजबांधव व महिला मंडळ उपस्थित होते.