चाळीसगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब केदारे यांच्या आदेशानुसार युवराज (संभा आप्पा) जाधव ता. अध्यक्ष ग्राहक संरक्षण समिती यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जळगाव जिल्हा सचिव रावसाहेब जगताप यांच्या उपस्थितीत भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक उपभोक्ता संरक्षण समीतीची चाळीसगाव कार्यकारिणी दि. ७ जुलै रोजी जाहीर करण्यात आली. व त्यावेळी पत्रकार सूर्यकांत कदम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
तालुका उपाध्यक्षपदी दिनेश जगताप, अरुणाताई खरात, तालुका सचिव मुकेश नेतकर, तालुका सहसचिव भाईदास गोलाईत, तालुका कार्याध्यक्षअफसर शरफोद्दीन खाटीक, तालुका सहसंपर्क प्रमुख सुशिल सोनवणे, तालुका संपर्क प्रमुख सुर्यकांत कदम, तालुका कोषाध्यक्ष हेमंत देवरे, कायदेविषयक सल्लागार अँड निलेश निकम, अँड. कविता जाधव यांची नियुक्ती करून जाहीर करण्यात आली. याप्रसंगी मिलिंद भालेराव, प्रविण मोरे, नानाभाऊ अहिरे, सागर जाधव समाधान जाधव, शाम जाधव, बाबा जाधव, कैलाश निकम, दिपक जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.