चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला गावातील अल्पवयीनाने पळवून नेत अत्याचार केला होता शिवाय पीडीतेच्या कुटूंबाला फसवण्याची धमकी देत दुसर्यांदामोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला होता. पोलिसांनी तपासात ज्या ठिकाणी पीडीतेवर अत्याचार करण्यात आला त्या महिलांचा शोध घेत त्यांना या गुन्ह्यात आरोपी केले असून त्यांना अटक केली आहे. संशयित महिला अल्पवयीन मुलांना शरीर संबंधासाठी पाचशे रुपये घेवून खोली उपलब्ध करून देत असल्याने त्यांना आरोपी करण्यात आल्याने या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शीतल ज्ञानेश्वर राठोड (51) व लताबाई दीपक पाटील (45) अशी अटकेतील महिलांची नावे आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीनाने गावातील एका अल्पवयीनाविरोधात 18 जुलै रोजी अत्याचार केल्याची तक्रार दिली होती. सुरुवातीला पाटणादेवीला जायचे असल्याचे सांगून नंतर आत्महत्या करण्याची व त्यात तिच्या घरच्या लोकांना फसवण्याची धमकी देऊन तिच्यावर रामकृष्ण नगर, मालेगाव रोड, चाळीसगाव येथे अत्याचार केला होता. दोन महिलांना पाचशे रुपये दिल्यानंतर या महिलांनी अल्पवयीनास खोली उपलब्ध करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर या महिलांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले.
चाळीसगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाी पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण व स्टाफने पीडीतेसह मुलाचा शोध घेत त्यांना पोलीस ठाण्यात आणले. अल्पवयीन मुलीस विश्वासात घेतल्यानंतर तिने सर्व आपबिती सांगितल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसात पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. विधीसंघर्ष ग्रस्त बालकासह बाल न्याय मंडळ, जळगावकडे हजर करण्यात आले तर अल्पवयीन मुलीसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी राहते घरातील एक खोली उपलब्ध करून देणार्या दोघा महिलांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी केली. तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहेत.