धरणगाव (प्रतिनिधी)अमळनेर येथील ‘रऊफ बँड’च्या मालकावर गंभीर आरोप करत धरणगाव तालुक्यातील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चंदन दिलीपराव पाटील यांनी धरणगावकरांना बँडवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
चंदन पाटील यांनी आरोप केला आहे की, रऊफ बँडच्या मालकाने अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शारीरिक व मानसिक शोषण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे अत्यंत गंभीर आणि निंदनीय कृत्य असून, यामध्ये गुन्हेगारी हेतू दिसून येत असल्याने संबंधितांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासोबतच, बँडच्या गाडीच्या वापरात देखील नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सांगण्यात आले असून, ही गाडी बनावट आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप करत, ती तातडीने राज्य परिवहन मंडळ, जळगाव यांनी जप्त करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
समाजाच्या रक्षणासाठी एकत्र येत या बँड पथकावर पूर्ण बहिष्कार टाकावा. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडेही करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.