TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना शाबासकीची थाप…; पोलिसांना शुभेच्छा देऊन नव्या वर्षाची सुरुवात

The Clear News Desk by The Clear News Desk
January 1, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) ‘महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वाला तोड नाही. पोलिसांच्या सूर्यप्रकाशा इतक्या स्वच्छ कर्तृत्वावर कुणीही डाग लावू शकत नाही. असेच कर्तृत्व येणाऱ्या वर्षभर नव्हे तर पुढील कित्येक वर्षे गाजवत रहा. नवीन वर्ष पोलीस दलातील सर्वांसाठी तणावमुक्तीचे जावो ही प्रार्थना,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस दलातील अधिकारी, कर्चमाऱ्यांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

नव वर्षाच्या प्रारंभीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन कोविड योद्धे तसेच उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, तुम्ही दक्ष राहता. तुम्ही सज्ज राहता म्हणून आम्ही नागरिक म्हणून सण, उत्सव साजरे शांततेत साजरे करू शकतो. कालची रात्र तुम्ही जागून काढली. म्हणून आज आम्ही नवीन वर्षाचा पहिला दिवस उत्साहाने सुरु करू शकत आहे. तुम्हाला आज धन्यवाद देण्यासाठी एक कुटुंब प्रमुख आणि नागरिक म्हणून आलो आहे. कोरोनाच्या या संकट काळातही पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. या काळात अनेकांना वर्क-फ्रॉम-होम म्हणून काम करण्याची सोय होती. पण पोलिसांसाठी असा पर्याय नाही. त्यामुळे कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अनेकांना शहीद व्हावे लागले.
पोलिसांसह महसूल, आरोग्य अशा अनेक यंत्रणांतील अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावल्याचे नमूद करून, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, व्यवहार बंद ठेवणे ही गोष्ट चांगली नाही, हे सगळ्यांनाच कळते. पण अजूनही संकट गेले नाही. पाश्चिमात्य देशात कोरोनाचा नवा धोका तयार झाला आहे. त्यामुळेच नागरिकांच्या हितासाठी किमान खबरदारी म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. जीव धोक्यात घालून यंत्रणा काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी किमान खबरदारी घ्यावी म्हणून आणि शिस्त पाळावी म्हणून जमावबंदीचे आदेश दिले आहेत. नवीन वर्षाचे स्वागत आनंदात आणि उत्साहातच व्हावे. पण भानावर राहून पुढचे पाऊल टाकावे अशी अपेक्षा आहे. त्यासाठीच काही बंधने घातल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी सतत कर्तव्याच्या विचारात असतात. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना वेळ-काळ याची पर्वा न करता काम करावे लागते. चोवीस तास त्यांना कामासाठी तातडीचे बोलावणे, तपास आणि बंदोबस्त यांसाठी सज्ज राहावे लागते, याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र आणि मुंबईच्या नागरिकांच्या वतीने आज नव वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी येथे आलो आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वाला तोड नाही. कुणी कितीही प्रयत्न केले, तरीही ते मुंबई असो किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या सूर्यप्रकाशा इतक्या स्वच्छ कर्तृत्वावर डाग लावू शकत नाही. आपल्या पोलिस दलाची परंपरा आणि कर्तृत्वच असे उत्कृष्ट आहे. असेच कर्तृत्व येणाऱ्या वर्षभर नव्हे तर पुढील कित्येक वर्षे गाजवत रहा. नवीन वर्ष पोलीस दलातील सर्वांसाठी तणावमुक्तीचे जावो ही प्रार्थना, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते कोविड योद्धा म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट तपास आणि गुन्ह्यांची उकल करून, तातडीने मुद्देमाल संबंधितांना परत करणाऱ्या पोलीसांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आदी उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

शिवसेनेच्या ऊर्दू कॅलेंडरवर बाळासाहेबांचा ‘जनाब’ उल्लेख; भाजपची टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आसोदा शिवारात रेल्वेरुळाखाली कुजलेला मृतदेह आढळला ; तालुका पोलिसात नोंद

March 18, 2021

जैन श्राविका मंडळाच्या अध्यक्षा पदी प्रतिभा जैन यांची निवड, पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

January 24, 2025

क्रिकेटचे द्रोणाचार्य वासू परांजपे यांचे निधन

August 30, 2021

बलात्काराच्या आरोपीला वाचवण्यासाठी बजरंग दल थेट पोलीस ठाण्यात ; गोंधळ घालत पोलिसांना मारहाण

April 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group