जळगाव (प्रतिनिधी) तीन दिवसापूर्वी दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडलेल्या चिमुकली आज उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील खंडेराव नगरातील हर्षल जोशी हे पत्नी पूर्वा, मोठी मुलगी शुभ्रा व लहान मुलगी श्राव्या व आई-वडिलांसह वास्तव्यास आहे. हर्षल जोशी हे जैन इरिगेशन कंपनीत नोकरीस असून पुर्वा जोशी या देखील महिनाभरपासून नोकरीस लागल्या होत्या. 20 नोव्हेंबर रोजी दोघे जण ड्युटीला गेले असल्याने त्यांची दोघ मुलींसह वरच्या मजल्यावरील भाडेकरुंची मुली असे सर्व चिमुकले वरच्या मजल्यावरील गॅलरीत खेळत होती. गॅलरीला लोखंडी ग्रील बसविले असून याठिकाणी खेळत असतांना श्राव्या लोखंडी ग्रीलमधून तोल गेला आणि ती जमिनीवर पडली. तिला तात्काळ उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तीन दिवस खासगी रुग्णालयात तीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपशयी ठरली आहे. उपचार सुरु असतांना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास श्राव्याची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, वाढदिवस साजरा झाल्यानंतर अवघ्या महिनाभरानंतर चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना त्याचा प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.