TheClearNews.Com
Thursday, February 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव बस स्टँड समोरील खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त

युध्द पातळीवर काम पूर्ण करावे अन्यथा उपोषणास बसणार - राजेंद्र वाघ

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहराच्या मध्यभागी असलेल्या महामार्गाचे म्हणजेच बसस्टँड समोरील नवा रस्ता बनविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत मागील काही महिन्यांपासून हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला असून पुढील काम सुरू करण्यास दिरंगाई होताना दिसत असल्याने नागरिकांना सतत प्रचंड वाहतूकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला लागून असलेल्या महामार्गाच्या रस्त्याचे नव्याने काम सुरू असल्याने ऐन दिवाळीच्या सणासुदीला खोदकाम करून ठेवले असून काम इतक्या संथ गतीने सुरू आहे की, त्याचा मनःस्ताप नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. एकंदरीत संबंधित ठेकेदाराच्या भोंगळ कारभार व नियोजन शून्य कारभार त्यातच वाहतूक पोलीस यांनी देखील संबंधित ठिकाणी बघ्याची भूमिका घेतलेली दिसतेय. या खोदलेल्या ठिकाणी तासंतास वाहतुकीच्या कोंडीने शहरात येणाऱ्या व शहराबाहेर जाणाऱ्या वाहनचालकांसाठी, कामगार व नागरिकांसाठी रोजची डोकेदुखी ठरत आहे.

READ ALSO

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

गेल्या महिनाभरापासून खोदून ठेवलेल्या रस्त्याच्या समस्येचा सर्वात जास्त त्रास बैलगाडी, गुरेढोरे, दिव्यांग, कामासाठी येणाऱ्या महिला व कर्मचाऱ्यांना होताना दिसत असून या रहदारीमुळे येतांना – जातांना नागरिक घसरून पडण्यासह अपघाताचे प्रकार होऊ लागल्याने सर्व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यांचे काम पालिकेला लवकर करायचे नव्हते तर, चांगला रस्ता उखडून ठेवला कशाला, असा संतप्त सवाल राजेंद्र वाघ यांच्यासह इतर त्रस्त प्रवासी व नागरीकांकडून यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज स्मरकाजवळ व बस स्टँड समोर नवा रस्ता बनविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागतर्फे गेल्या महिनापासून हाती घेण्यात आले आहे. यासाठी प्रशस्त असलेला चांगला रस्ता उखडून ठेवला. त्यावेळी हे काम जलद गतीने होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती परंतु आजमितीस महिना होत आला तरी कामाला म्हणावी तशी गती नाही व त्यातच रस्ता खड्डेमय झाला असल्याने वाहनचालकांसह कामगार विशेष करून महिलांना त्याचा जास्त त्रास होत आहे. वाहनचालकांना वाहन काढता येत नाही तर गुरेढोरे, दिव्यांग, विकलांग, महिलावर्ग व जेष्ठ नागरिकांची काय अवस्था असेल याची कल्पना न केलेली बरी. अत्यंत कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे हा सर्व रस्ता धोकादायक झाला असून, काम तातडीने पूर्ण करा. सुरक्षित वाहतूक व्यवस्थेला मदत करा, अशी मागणी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. दरम्यान, एकंदरीत या रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सदरचे काम अत्यंत कासव गतीने होणे अयोग्य असून नागरिकांना होणारा मोठा त्रास लक्षात घेता संबंधित प्रशासनाने काम तातडीने पूर्ण करावे अन्यथा नागरिकांसमवेत आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा प्रवासी, वाहनचालक व नागरिकांकडून देण्यात आला आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल न घेतल्यास साखळी उपोषणाला बसण्याचा सल्ला आबासाहेब राजेंद्र वाघ व त्यांच्या मित्र परिवाराने दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
Next Post

रब्बी हंगामातील पिकांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शरद पंढरीनाथ पाटील यांचे निधन, उद्या अंत्यसंस्कार

September 5, 2025

देशभक्तीच्या रंगात रंगले जिल्हा कारागृह

March 25, 2025

मोठी बातमी : शिवसेनेला आणखी एक धक्का, 14 खासदार शिंदे गटाच्या बैठकीला हजर !

July 18, 2022

खडसेंनी श्रीराम पाटलांची माफी मागावी मगच इकडे यावे : डॉ. सतीश पाटील !

September 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group