जळगाव (प्रतिनिधी) शहरात असणारे हॉकर्स आज उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या भेटीला आले होते.
यावेळी फेरीवाला धोरण २००९ प्रमाणे करवाई करून उचित असे निर्णय घेऊन त्याअनुषंगाने २०१४चे नगरपथ विक्रेता समिती व २०१६चे उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी हॉकर्स धारकांनी केली.