यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील अट्रावल या गावात मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात वाद उफाळला व यावल पोलिसात दिलेली तक्रार मागे घ्या या वरून दोन गटांमध्ये दंगल घडली. हाणामारीत पाच जण जखमी झाले असून दोन्ही गटाकडून यावल पोलीस ठाण्यात 13 जणांविरुद्ध दंगली सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गावात डीवायएसपींसह पोलीस निरीक्षकांनी भेट देवून पोलीस बंदोबस्त लावला.
पहिल्या गटाच्या तक्रारीवरून दंगलीचा गुन्हा !
अट्रावल, ता.यावल येथे मागील भांडणाच्या कारणावरून पोलिसात दिलेली तक्रार मागे घ्या असे सांगत दोन गटांमध्ये वाद झाला व दोन गटात दंगल घडली. यामध्ये रीतेश दिवाकर तायडे (19), छाया दिवाकर तायडे (38), चेतन वासुदेव कोळी (24), चंद्रकांत पंडित कोळी (53) व हेमंत चंद्रकांत कोळी (24) असे दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले. जखमींना यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारार्थ आणण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण, अधिपरीचारीका ज्योत्ना निंबाळकर, अमोल अडकमोल आदींनी प्रथमोपचार केले.
यातील गंभीर जखमी दोघांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्यात आले. तर घटनेची माहिती मिळताच फैजपूरचे डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर हे पथकासह दाखल झाले व परिस्थितीवर नियंत्रण मिळवत गावात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. याप्रकरणी छायाबाई दिवाकर तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हेमंत चंद्रकांत कोळी, चेतन वासुदेव कोळी, कैलास संतोष कोळी, निलेश संजय कोळी, चंद्रकांत पंडित कोळी, सरस्वतीबाई वासुदेव कोळी व अंजनाबाई चंद्रकांत कोळी या सात जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसर्या गटाकडून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
दुसर्या गटाकडून चेतन वासुदेव कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माझ्याकडे काय बघतो या कारणावरून फिर्यादी व त्याच्या मित्रांना रीतेश दिवाकर तायडे, दिवाकर उर्फ पिंटू तायडे, पद्माकर टोपलु तायडे, चिंतामण पंढरी तायडे, कुणाल चिंतामण तायडे व छायाबाई दिवाकर तायडे या सहा जणांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. सहा जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला.