धरणगाव (प्रतिनिधी) ‘धरणगावातील तेली तलावात घाणीचे साम्राज्य ; नागरीकांचे आरोग्य धोक्यात’ या शीर्षकाखाली ‘द क्लिअर न्यूज’ ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर आज तातडीने तेली तलावाच्या स्वच्छतेचे काम सुरु करण्यात आले आहे.
तेली तलाव परिसरात हजारो लोकांचे श्रद्धास्थान असलेले सिध्दी हनुमान मंदीर व ग्रामदैवत मरीआईचे मंदीर आहे. तेथे दररोज शेकोडो भाविक मोठ्या श्रध्देने व भावनेने दर्शनाला जातात. परंतु बाजूस असलेल्ये तेली तलावात घाणीचे मोठे साम्राज्य पसरलेले होते. तसेच सर्वत्र दुर्गधीमुळे भाविकांसह नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले होते.परंतू मच्छिमारांचे नुकसान होऊ नये, यासाठी पालिका प्रशासनाने कुठलीही पावडर वजा केमिकल टाकू नये, अशी विनंती मच्छीमार सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.
तेली तलावात मोठ्या प्रमाणात मासेंचे बियाणे टाकण्यात आले होते. पावडर किंवा केमिकल टाकले असते तर मच्छिमार बांधवांचे लाखोंचे नुकसान झाले असते. परंतू दुर्गंधी वाढल्यानंतर मात्र, पालिका प्रशासन स्वच्छता मोहीम हातात घेणार होती. पण मच्छीमार सोसायटीच्या सदस्यांनी आम्ही स्वतः तलाव स्वच्छ करून देतो, परंतू तलावात कुठलीही पावडर टाकू नका अशी विनंती केली. त्य्यानुसार आजपासून तलावाच्या स्वच्छतेचे काम सुरु करण्यात आले आहे. पुढील एक-दोन दिवसात तालवातून संपूर्ण घाण बाहेर काढली जाईल, असा अंदाज आहे.