धरणगाव (प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णालयात जळगाव जिल्हाचे जिल्हाधिकारी ड अभिजित राऊत यांनी भेट दिली.
याप्रसंगी तहसीलदार नितीन कुमार देवरे, धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत धरणगाव शहरातील विविध विषयांवर चर्चा केली तसेच धरणगाव शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी धरणगाव शहर शिवसेनातर्फे कोविड लसीकरणाचा कॅप आजपासून पुढील १० दिवस लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांना दिली. या लसीकरणाला नागरिक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे. शहरात मोरवडी परिसर व मोठा माळी वाडा परिसर येथे एकूण १५०० नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक शंकर शेळके तसेच ग्रामीण रुग्णालयाचा स्टॉफ उपस्थित होता.