जळगाव (प्रतिनिधी) आमदार संजय सावकारे यांची कार परस्पर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर केल्याच्या प्रकरणात ज्या व्यक्तीने कार ट्रान्सफर करण्यासाठी चलन भरले ‘त्या’ मुख्य सुत्रधाराकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे कुठं तरी पाणी मुरतंय का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
आरटीओ कार्यालयातील तीन लिपीक व एक अधिकारी अशा चार जणांवर हलगर्जीचा ठपका उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी ठेवला आहे. हा चौकशी अहवाल परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांना सादर करण्यात आल्याचे कळतेय. एवढेच नव्हे तर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी सायबर पोलीस ठाण्यात स्वतः ज्या क्रमांकावर ओटीपी गेला त्या व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली आहे. परंतू ज्या व्यक्तीने कार ट्रान्सफर करण्यासाठी चलन भरले. त्या खातेधारकाचा फिर्यादीत उल्लेख केलेला नाहीय. वास्तविक बघता कार ट्रान्सफर करण्यासाठी आकारण्यात आलेले चलनाचे पैसे ज्या बँक खातून भरले गेले, तो व्यक्तीच या षड्यंत्राचा मुख्यसुत्राधार आहे, हे उघड असूनही त्याच्याकडे का दुर्लक्ष केले जातेय?, असा सवाल आता उपस्थित होत आहे.