TheClearNews.Com
Wednesday, July 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाची लस घेणं हे कुणालाही बंधनकारक करता येणार नाही ; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

The Clear News Desk by The Clear News Desk
January 17, 2022
in कोर्ट, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाची लस (Corona Vaccination) घेणं हे कुणालाही बंधनकारक करता येणार नाही, तर हा मुद्दा पूर्णपणे ऐच्छिक असेल, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या कोविड-१९ लसीकरण मार्गदर्शक तत्त्वांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय सक्तीने लसीकरण करण्याचा कुठलाही उल्लेख नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे.

दिव्यांग व्यक्तींना लसीकरण प्रमाणपत्रे दाखवण्यापासून सूट देण्याच्या मुद्द्यावर केंद्राने कोर्टात भूमिका स्पष्ट केली. अशी कोणतीही ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) जारी केलेली नाही, ज्यामुळे कोणत्याही हेतूसाठी लसीकरण प्रमाणपत्र ठेवणे सक्तीचे ठरते, असे केंद्राने म्हटले आहे. एवारा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेला केंद्राने प्रतिज्ञापत्रातून उत्तर दिले आहे. घरोघरी जाऊन दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करण्याची विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वांमध्ये संबंधित व्यक्तीची संमती घेतल्याशिवाय सक्तीने लसीकरण करण्याबाबत कुठलीही सूचना नाही’, असे केंद्राने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. कोणत्याही व्यक्तीच्या परवानगी आणि इच्छेशिवाय लसीकरण केलं जाणार नाही, असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

देशात काय आहे कोरोनाची स्थिती?

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ५८ हजार ०८९ रुग्ण आढळले आहेत. तर ३८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात गेल्या २४ तासांत १ लाख ५१ हजार ७४० नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. पण देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही १६ लाख ५६ हजारांवर आहे. पॉझिटिव्हीटी दर हा ११९.६५ टक्क्यांवर गेला आहे. देशातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ही ८ हजार २०९ इतकी झाली आहे.

देशात कुठवर पोहोचलंय लसीकरण ?

१६ जानेवारी २०२२ ला देशातील कोरोना लसीकरण मोहिमेची सुरुवात होऊन एक वर्ष पूर्ण झालं. १६ जानेवारी २०२१ या दिवसापासून देशात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स या वर्गात मोडणाऱ्या नागरिकांचं लसीकरण करण्यास सुरुवात झाली होती. तेव्हापासून सुरु झालेलं लसीकरणाचं सत्र आजच्या दिवसापर्यंत सुरुच आहे.

आतापर्यंत देशात १५६ कोटी लसींचे डोस

केंद्राकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशात १५६ कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत. पण, अद्यापही देश १०० टक्के लसीकरणाच्या टप्प्यापासून दूर आहे. सध्या देशात कोरोनाची तिसरी लाट उसळलेली असतानाच या टप्प्यामध्ये लसीकरण मोलाची भूमिका निभावताना दिसत आहे. मुख्य बाब अशी, की देशात सध्य़ा ८ टक्के लोकसंख्या अशीही आहे की ज्यांनी आतापर्यंत लसीचा पहिला डोसही घेतलेला नाही. तर, ३१ टक्के लोकसंख्येचं लसीकरण पहिल्या डोसवरच येऊन थांबलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #CoronaVaccination

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
कोर्ट

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

March 10, 2026
Next Post

५ रुपयाचं 'हे' नाणं द्या आणि मिळवा ५ लाख ; कसं आणि कुठे शक्य आहे, लगेच माहित करुन घ्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवाजी महाराजांबद्दल एकेरी भाषेत उल्लेख केल्यास कायदेशीर करावी ; मराठा फाउंडेशनची मागणी !

October 11, 2022

पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणीचा विनयभंग

May 22, 2026

Horoscope : आजचं राशीभविष्य, बुधवार २० जुलै २०२२ !

July 20, 2022

अतिवृष्टी अन् आव्हानांवर मात करत जैन इरिगेशन कंपनीच्या महसुलात लक्षणीय वाढ

October 30, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group