जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज सांयकाळी प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यातून २७६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ५०१ रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर -७३, जळगाव ग्रामीण-११, भुसावळ-३१, अमळनेर-१०, चोपडा-६, पाचोरा-१, भडगाव-१, धरणगाव-३, यावल-३, एरंडोल-५, जामनेर-१०६, रावेर-१०, पारोळा-०, चाळीसगाव-८, मुक्ताईनगर-२, बोदवड-० आणि अन्य जिल्हा ६ असे एकुण २७६ रूग्ण आज आढळून आले आहे. जिल्ह्यात एकुण ४९ हजार ७११ रूग्ण आढळून आले असून ४४ हजार ३०२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज २ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण जिल्ह्यात १२०६ रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे. तर जिल्ह्यात आता ४ हजार २०३ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.