जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ६२ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे आज जिल्ह्यात ७४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दम्यान, दिलासादायक म्हणजे आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर –१२, जळगाव ग्रामीण- ०४, भुसावळ- १४, अमळनेर- ०३, चोपडा-०७, पाचोरा-०१, भडगाव-०१, धरणगाव-००, यावल-०२, एरंडोल-००, जामनेर-०१, रावेर-०७, पारोळा-००, चाळीसगाव-०७, मुक्ताईनगर-०२, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण ६२ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५३ हजार ४२१ पर्यंत पोहचली असून ५१ हजार ५०४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर सुदैवाने आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर आतापर्यंत १२६९ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. तर ६४८ रुग्ण सध्या उपचार घेताय.