जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ७ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ३३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ०२, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-०१, अमळनेर-००, चोपडा-००, पाचोरा-०१, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-०२, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-०१, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ७ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४२ हजार ४३१ पर्यंत पोहचली असून १ लाख ३९ हजार ५७१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५७४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर २८६ रुग्ण सध्या उपचार घेताय.