धरणगाव (प्रतिनिधी) स्व.सुनिलभाऊ मित्र परिवारातर्फे आयोजित भव्य प्लास्टिक बॉल स्पर्धेला मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात सुरुवात झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज भव्य प्लास्टिक बॉल स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. सर्वप्रथम स्व.सुनिल महाजन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. तद्नंतर क्रिकेटच्या साहित्याचे म्हणजेच स्टंप, बॅट आणि बॉल चे देखील पूजन करून व नारळ फोडून स्पर्धेला सुरवात झाली. स्पर्धेच्या सुरवातीला कैलास माळी सरानी आपल्या फलंदाजीचे कसब दाखवत २ उत्तुंग षटकार लगावले. पहिला सामना बेलदार जांभोरा वर्सेस न्यू खिलाडी धरणगाव यांच्यात रंगला. आतापर्यंत या स्पर्धेत २२ संघांनी नोंदणी केली असून अजूनही नोंदणी सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली. स्पर्धेचे ठिकाण महंत श्री भगवान बाबा यांच्या मठाच्या मागे असून स्पर्धेची प्रवेश फी ५०१ रुपये आहे. या स्पर्धेसाठी नगरसेवक ललित येवले यांच्याकडून प्रथम बक्षीस ७१०१ रु., द्वितीय बक्षीस उपशहरप्रमुख दिपक पाटील व राहुल रोकडे यांच्याकडून ५१०१ रू. आणि तृतीय बक्षीस स्व. सुनिल भाऊ मित्र परिवारातर्फे २५०१ रु. देण्यात येणार आहे. आज दिवसभरात ६ राउंड खेळवले गेले असून साधारण ८ दिवस ही स्पर्धा रंगणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी भाजपा गटनेते कैलास माळी, नगरसेवक ललित येवले, शिवसेना उपशहरप्रमुख दिपक पाटील, राहुल रोकडे, विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील, नगरसेवक अजय चव्हाण, शिवसेना शाखा प्रमुख समाधान वाघ, भाजीपाल्याचे व्यापारी शांताराम महाजन, कन्हैया माळी आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन स्व.सुनिल भाऊ मित्र परिवार यांच्यातर्फे करण्यात आले असून रावसाहेब पाटील, चेतन माळी, गजानन महाजन व विजय महाजन हे आयोजक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सुनिल भाऊ मित्र परिवार, जय बजरंग व्यायाम शाळा (हनुमान नगर), काकासट व्यायाम शाळा (शेंडी ग्रुप), बजरंग दल मित्र मंडळ यांचे अनमोल सहकार्य लाभणार आहे.