जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेस विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसतर्फे (Congress) तीव्र आंदोलन छेडण्यात आले. यावेळी शर्म करो..शर्म करो..नरेंद्र मोदी शर्म करो..अशी घोषणाबाजी करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाबाबतच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचा व जनतेचा अपमान केला असून मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेची तत्काळ माफी मागावी, यासाठी काँग्रेसने मोदीचा निषेध केला असून आज काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महानगराध्यक्ष शाम तायडे, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, योगेंद्र पाटील, सचिन सोमवंशी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते.