जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्याला प्रशासनाला सलग नऊ दिवसांपासून दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक राहीली आहे. जिल्ह्यात आज नव्याने ४६७ रूग्ण आढळून आले असुन १० रूग्णांचा आज मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात ७७१ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून घरी परतले आहे.
आजची आकडेवारी
जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर- १८४, जळगाव ग्रामीण- १८, भुसावळ-३०; अमळनेर-३९; चोपडा-१८; पाचोरा-१७; भडगाव-२७; धरणगाव-५; यावल-७; एरंडोल-५; जामनेर-३३; रावेर-३०; पारोळा-२५; चाळीसगाव-८; मुक्ताईनगर-१०; बोदवड-१० आणि इतर जिल्ह्यांमधील २ असे एकुण ४६७ रूग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, आज ७७१ रूग्ण बरे झाले असून आजवर बरे होणार्यांची संख्या ३७,५५२ इतकी झाली आहे. तर आज १० मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ११५५ वर पोहचला आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाचे सक्रीय रूग्ण ८०३५ इतके आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.