जळगाव (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर येथील एक विद्यार्थीनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी शहरातील एका होस्टेलमध्ये राहते. एका तरुणाने सतत पाठलाग करून तसेच रविवारी मध्यरात्री विद्यार्थिनीला तब्बल 31 वेळा फोन करुन मानसिक त्रास दिला. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, रविंद्र खेडकर (पूर्ण नाव गाव माहित नाही) हा सतत पाठलाग करायचा. तसेच उद्या मला सिल्व्हर पॅलेस हॉटेलवर भेटायला ये असे सतत फोन करुन त्रास देत होता. विद्यार्थीनीस त्रास देणा-याने काही एक कारण नसतांना विद्यार्थीनीला रविवारी मध्यरात्री तब्बल 31 वेळा फोन केला. याशिवाय विद्यार्थिनीचा बुलेटने पाठलाग करुन विनयभंगाचा प्रकार सुरुच होता. शेवटी त्रास असह्य झाल्यानंतर पिडीत विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला रवींद्र खेडकर या तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हे.कॉ. सुनिल पाटील करत आहेत.