नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट होताना पाहायला मिळाला आहे. गेल्या २४ तासांत ४ लाख १२ हजार ६१८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३ हजार ९८० कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले असून एका दिवसात सर्वात जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे.
आतापर्यंत देशात २ कोटी १० लाख ७७ हजार ४१० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १ कोटी ७२ लाख ८० हजार ८४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २३ हजार १६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या ३५ लाख ६६ हजार ३९८ करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी आतापर्यंत १६ कोटी २५ लाख १३ हजार ३३९ जणांचं लसीकरण केलं असल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य खात्यानं दिली आहे.
देशातील १२ राज्यात १ लाखांहून अधिक, ७ राज्यात ५० हजाराहून अधिक आणि १५ राज्यात ५० हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्ण आहेत. २४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात १५ टक्क्यांहून अधिक पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. देशात कोरोनाचे प्रत्येक दिवशी २.४ टक्के वेगाने रुग्ण वाढत आहेत.
राज्यात बुधवारी ५७,६४० कोरोनाबाधित रुग्णांचे निदान
राज्यात बुधवारी तब्बल ५७ हजार ६४० कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर ५७ हजार ००६ कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण ४१,६४,०९८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण ८५.३२% एवढा झाला आहे. दरम्यान काल ९२० कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मत्यूदर १.४९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,८३,८४,५८२ प्रयोगशाळा नमुन्याांपैकी ४८,८०,५४२ (१७.१९ टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८,५२,५०१ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर ३२,१७४ व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.