TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोना : घरगुती गणपतीसाठी ‘या’ आहेत मार्गदर्शक सूचना !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 8, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) येत्या १० सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी घरोघरी बाप्पांचं आगमन होईल. पण गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही गणपती उत्सवावर कोरोनाचं सावट आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दरम्यान, सरकारने आता कोव्हिडकाळात गणपतीचं आगमन आणि विसर्जनासाठी नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यायची, यासंबंधीच्या सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.

गणपतीचं आगमन आणि विसर्जनासाठी काय आहेत मार्गदर्शक सूचना ?

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

1. घरगुती गणेशमूर्तींचं आगमन मिरवणुकीच्या स्वरूपाचं नसावं. आगमनासाठी जास्तीत-जास्त ५ जणांचा समूह असावा. शक्‍यतोवर या व्यक्तींनी कोरोना लशीचे दोन डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत. घरगुती उत्‍सवासाठी गणपतीची मूर्ती २ फुटांपेक्षा जास्त उंचीची नसावी.

2. घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी. शक्य असल्यास यावर्षी पारंपारिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू/संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. जेणेकरुन, आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतःचे/कुटुंबियांचे कोव्हिड-१९ पासून संरक्षण होईल.

3. घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचं विसर्जन शक्यतोवर घरच्या घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावं.

4. गणेशमूर्तींचं विसर्जन घरच्या घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचं विसर्जन करण्यात यावं. तसंच सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी देखील नजीकच्‍या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचं विसर्जन करण्‍यास प्राधान्‍य द्यावं.

5. घरगुती गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये. विसर्जनासाठी जास्तीत जास्त ५ व्‍यक्‍ती असाव्‍यात. या व्यक्तिंनी कोरोना लशीचे २ डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत.

6. घरगुती गणेशमूर्तीचं विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्रितरित्या नेऊ नयेत.

7. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावं. विसर्जन प्रसंगी मास्‍क/शिल्‍ड इत्यादी स्‍वसंरक्षणाची साधने काटेकोररित्‍या वापरण्‍यात यावी.

8. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.

9. मुंबई शहरात एकूण ७३ नैसर्गिक विसर्जन स्‍थळं आहेत. तिथे महापालिकेद्वारे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ देवून मूर्ती संकलनाची शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. त्‍यांच्याकडे गणेशमूर्ती देण्‍यात यावी. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे.

10. नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी मुंबई महानगरपालिकेच्‍या २४ विभागांमध्‍ये सुमारे १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणाऱ्या भाविकांनी शक्‍यतोवर या कृत्रिम तलावाचा वापर करावा.

11. महापालिकेच्‍या काही विभागांतर्गत काही गणेशमूर्ती संकलन केंद्रं निर्माण करण्‍यात आली आहेत. मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सूपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा आणि आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.

12. विसर्जनादरम्‍यान सोशल डिस्टन्सिंग, मास्‍क, सॅनिटायझर वापरणे यांसारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

13. सील केलेल्या इमारतींमधील गणेशमूर्तीच्‍या विसर्जनासाठी घरीच व्‍यवस्‍था करावयाची आहे.

14. घर/इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करण्यात यावे.

15. मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांनी घालून दिलेल्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्‍यात यावे.

16. उत्सव प्रसंगी अशी कोणतीही कृती करु नये, जेणेकरुन कोरोना विषाणूचा फैलाव होईल. अन्यथा अशी व्यक्ती साथरोग कायदा १८९७, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा २००५ आणि भादवि १८६० कायद्यान्वये कारवाईस पात्र ठरेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

जळगावात २१ सप्टेंबर रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केल : देवेंद्र फडणवीस

December 25, 2020

खळबळजनक : शाळेतील पाण्याच्या टाकीत टाकले विषारी औषध ; पाचोरा पोलीसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल !

April 2, 2024

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

April 20, 2025

दिलासादायक : आजही कोरोनाबाधीतांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त !

October 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group