पाळधी खुर्द ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील गरीब रुग्णांच्या कैवारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. आत्माराम काळू पाटील (वय ५०) यांचं ३ एप्रिल रोजी कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.
डॉ. आत्माराम पाटील हे ९ मार्च रोजी कोरोनाबाधित झाल्यानंतर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. ३ तीन एप्रिल रोजी त्यांच्या कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समजतात अनेकांचे डोळ्यातून अश्रू आले. डॉ. पाटील हे पाळधी येथे २५ वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय करीत होते. गोरगरीब तसेच कामगार असल्यास पैसा असो की नसो ते उपचार करायचे, आत्माराम हे सध्या जळगावचे निवृत्तीनगरात राहत होते. मुलगा चेतन हा गोदावरी कॉलेज येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे.