TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनावर लसीकरण प्रभावी : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 22, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लसीकरणानंतर कोरोना होऊ शकतो, पण लसीकरणानंतर झालेल्या कोरोनाची तीव्रता कमी असते. ताप, खोकला किंवा कोरोनामुळे शरीराच्या इतर अवयवांवर कोरोनाचा परिणाम होत नाही. कोरोना लसीकरणुळे ९४ टक्के लोकांना संरक्षण मिळते. त्यामुळे लसीकरण महत्वाचे आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी कळविले आहे.

देशभर लसीकरणाची मोहीम सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातही ६० वर्षावरील आणि ४५ वर्षावरील इतर आजार असणाऱ्या नागरीकांचे लसीकरण केले जात आहे. दरम्यान लसीकरणामुळे कोरोना होणार नाही, अशी अनेकांची समजूत आहे. वास्तविक लसीकरणानंतरही काही लोकांना कोरोना होऊ शकतो. मात्र कोरोना संसर्ग झाल्यानंतर एखाद्याच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामाला निश्चितपणे लगाम बसणार आहे. लस घेतल्यानंतरही सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. कोरोनाच्या आधी लस घेणे गरजेचे आहे. मास्क वापरणे बंधनकारक आहे. सध्या कोरोनामुळे १०० पैकी २ ते ३ लोकांचा मृत्यू होत आहे. हे मृत्यूचे प्रमाण रोखण्यात शासनाकडून दिली जाणारी लस प्रभावीपणे काम करते. मृत्यूदर कमी करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. सध्या कोविशिल्ड व कोवॅक्सिन ह्या लस दिली जात आहे. दोन्ही लस प्रभावी आणि सुरक्षित आहे. ६० वर्षावरील प्रत्येक व्यक्ती आणि ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्ती जसे कॅन्सर, किडनीचे आजार असणाऱ्यांनाही ही लस घेता येते.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

जळगाव जिल्हयात पहिल्या टप्प्यात आरेाग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सला तर तिसऱ्या टप्यात ६० वर्षावरील प्रत्येक व्यक्ती आणि ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८६ हजार ६७७ व्यक्तींना पहिला डोस तर ११ हजार ६९८ व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरणासाठी जिल्हयात ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र, २२ ग्रामीण रुग्णालये, २३ खाजगी रुग्णालये ह्या ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरु आहेत.

लस घेतल्यानंतर हे जाणवेल

लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी, अशक्तपणा हे सामान्य परिणाम दिसतात ते १ ते २ दिवस राहतात. सध्या पॅरासिटमॉल या औषधाने बरे वाटते. काहीला ते जाणवत नाहीत. इतर त्रास झाला तर घाबरण्याचे कारण नाही, लसीमुळे प्रतिकारशक्ती वाढते.

लस घेण्यासाठी जाताना

लस घेण्याआधी जेवण करुन जावे तसेच आधारकार्ड व पॅनकार्ड अथवा ओळखपत्र घेऊन जावे. दोन वेळा लस घ्यावी लागते, पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घेतला पाहिजे, हदयरोग, किडनी विकार, प्रत्यारोपण, संधिवात, स्टिरॉईड घेणाऱ्यांनी लस घ्यावीच. धोका नसला तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्यास उपयुक्त ठरते.

कोणी लस घेऊ नये

गर्भवती महिला आणि १६ वर्षाखालील मुलांनी लस घेऊ नये,

लसीकरणानंतर काय खबरदारी घ्यावी

लसीकरणानंतरही मास्क, सॅनिटायझरचा वापर, तसेच सुरक्षित अंतर ठेवलेच पाहिजे, लसीकरणामुळे मृत्यूदर कमी करण्यास मदत होणार आहे. गभीर रुग्णांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा व त्यानंतर १४ दिवसात शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते. असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद डॉ. जमादार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

महापौर जयश्री महाजन पहिल्याच दिवसापासून जनसेवेसाठी तत्पर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जाणून घ्या…जळगाव जिल्ह्यातील सर्व ७७ जिल्हा परिषद गटांचे आरक्षण !

July 29, 2022

चोपडा :​​​​​​​ धानोऱ्यात वाजंत्री बंद करण्यावरुन वाद ; पोलिसांचा लाठीमार, दगडफेक !

September 5, 2022

सामाजिक कार्यकर्त्या प्रा.जयश्री साळुंके यांना राज्यस्तरीय नारिदिप सन्मान पुरस्कार जाहीर

March 12, 2021

चार राज्यांमध्ये भाजपची आघाडी, पंजाबमध्ये मात्र आप ; काँग्रेसचा सुपडा साफ !

March 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group