TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चार राज्यांमध्ये भाजपची आघाडी, पंजाबमध्ये मात्र आप ; काँग्रेसचा सुपडा साफ !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 10, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशात मतमोजणी होऊन दोन तास उलटले आहेत. ट्रेंडनुसार भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपने 203 जागांचा टप्पा ओलांडला आहे. सपानेही शंभरी पार केली आहे. तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बसपाला दुहेरी आकडाही पार करता आलेला नाही. योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून, तर अखिलेश यादव करहलमधून आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे मणिपूरमध्ये भाजपने मुसंडी मारली असून 25 जागांवर आघाडीवर आहे. आपमुळे पंजाब काँग्रेसमुक्त झालेय. गोव्यात त्रिशंकु विधानसभा राहण्याची स्थिती निर्माण झालीय. तर उत्तराखंडमध्ये भाजप ४३ जागांवर आघाडीवर आहे.

उत्तर प्रदेशात भाजप स्पष्ट बहुमताच्या जवळ !
सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप (BJP) आणि समाजवादी पक्ष यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. भाजपनं पहिल्या दोन तासांच्या कलांमध्ये बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपला 222 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्याचबरोबर समाजवादी पक्षाची आघाडीही निवडणुकांमध्ये ‘काँटे की टक्कर’ देत आहेत. समाजवादी पक्ष 111 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, जर आपण मतांच्या टक्केवारीबद्दल बोललो तर, निवडणूक आयोगाच्या मते, सपाला 31 टक्के मते मिळाली आहेत, तर भाजपला 42 टक्के मते मिळाली आहेत. पोस्टल मतमोजणीनुसार भाजपा २०९ जागांवर आघाडीवर आहे. यामुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात योगी सरकार येण्याचे संकेत स्पष्ट दिसू लागले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल.

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

AAP मुळे पंजाब काँग्रेसमुक्त

आम आदमी पार्टीची रथ तुफान वेगाने आघाडी घेत आहे. आम आदमी पार्टीला तब्बल 88 जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसून येत आहे. पंजाबमध्ये प्रकाशसिंग बादल आपल्या जागेवर पिछाडीवर आहेत. आम आदमी पक्षाने आता ४९ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसने ७ तर अकाली दलाने ७ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप आघाडी ३ तर इतर १ जागेवर आघाडीवर आहे. तर पंजाब निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सध्या पंजाबमध्ये आम आदमी पार्टी 82 जागांवर आघाडीवर आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 16 जागांवर, अकाली दल 8 जागांवर, भाजप 3 जागांवर आणि इतर 2 जागांवर आघाडीवर आहेत.

गोव्यात त्रिशंकु विधानसभा !

त्रिशंकु विधानसभेच्या शक्यतेमुळे गोव्यातील परिस्थिती सध्या कमालीची रंजक झाली आहे. सध्याच्या घडीला काँग्रेस आणि भाजप यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. ४० जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी २२ जागा आवश्यक आहेत. परंतु, सध्या काँग्रेस आणि भाजप पक्ष १५ जागांच्या आसपास घुटमळत आहेत. क्षणाक्षणाला हे कल बदलत आहेत. यामध्ये दोन्ही पक्ष आळीपाळीने आघाडी घेताना दिसत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातील लढतीत पिछाडीवर पडले आहेत. तर भाजपला सोडचिठ्ठी देऊन पणजीतून अपक्ष उभे राहणारे उत्पल पर्रिकर हेदेखील पिछाडीवर आहेत. पणजीत भाजपचे बाबुश मोन्सेरात हे आघाडीवर आहेत. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. अद्याप संपूर्ण निकाल यायला बराच वेळ बाकी आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलूही शकते. तर गोव्यातील निवडणुकीत नशीब आजमवणाऱ्या शिवसेनेचा एकही उमेदवारी सध्या तरी विजयी होण्याच्या स्थितीत दिसत नाही. सुरुवातीच्या कलांनुसार भाजप १६, काँग्रेस १५ जागांवर आघाडीवर आहे. तर मगोप-तृणमूल काँग्रेस आघाडी सात जागांवर आघाडीवर आहे.

उत्तराखंडमध्ये धक्कादायक कल
उत्तराखंडमध्ये सर्व ७० जागांचे सुरुवातीचे कल आले आहेत. भाजप ४३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस २३ जागांवर आघाडीवर आहे. पाच जागांवर अन्य पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर सर्व ७० जागांसाठी पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या आपचा एकही उमेदवार आघाडीवर नाही. धक्कादायक म्हणजे, उत्तराखंडमध्ये विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी खतिमा मतदारसंघात पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे भुवन सिंह कापरी हे आघाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री हरिश रावत हे देखील लालकुआं मतदारसंघात पिछाडीवर आहेत.

मणिपूरमध्ये भाजपची मुसंडी, 25 जागांवर आघाडी
मणिपूरमधील 60 जागांपैकी भाजपला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. भाजप 28 जागांवर आघाडीवर असून राज्यात काँग्रेसची पिछेहाट होताना दिसत आहे. मणिपुरमध्ये सर्व 60 जागांचे ट्रेंड हाती आले आहेत. भाजप सर्वाधिक 25 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 14 जागांवर पुढे, एनपीएफ (नागा पीपल्स फ्रंट) 4 (नागा पीपल्स फ्रंट), एनपीपी (नॅशनल पीपल्स पार्टी) 11 आणि इतर 6 जागा मिळताना दिसताय.

‘या’ तीन राज्यांचे मुख्यमंत्री पिछाडीवर

तीन राज्यांचे मुख्यमंत्री त्यांच्या जागेवरून पिछाडीवर आहेत. उत्तराखंड, गोवा आणि पंजाबमधील मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी, प्रमोद सावंत आणि चरणजितसिंग चन्नी आपापल्या जागेवरून पिछाडीवर आहेत. मात्र, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजप बहुमताच्या जवळपास पोहोचला आहे. गोव्यातही भाजप इतर पक्षांच्या तुलनेत आघाडीवर आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
Next Post

कृषी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी उरला केवळ एक महिना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…म्हणून मी पाचवर्षीय मुलीचा विहिरीत फेकून खून केला ; आरोपी बापाची धक्कादायक कबुली !

August 21, 2023

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारा : सुप्रिया सुळे

October 16, 2020

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना धुळे कोर्टाचा दिलासा

May 10, 2022

‘शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार’ मिळवण्यासाठी शासनाची फसवणूक ; जळगावात ९ जणांविरुद्ध गुन्हा !

November 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group